बुलडाणा, दि. 25 : प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवारी, दि. 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.15 वाजता जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वज वंदन होणार आहे.प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन होणार आहे. संचलनात विविध विभागाचे चित्ररथ सहभागी होतील. तसेच उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात येणार आहे. राष्ट्रध्वज वंदनाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी राष्ट्रीय पोषाखात सकाळी नऊ वाजेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Users Today : 39