बुलडाणा, दि. 25 : बँक ऑफ महाराष्ट्र, जीवननोत्ती अभियान उमेद आणि आरसेटी यांच्या वतीने आरसेटीच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय कौशल्य आणि ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. त्यात अनिता चवरे यांनी उद्योजकता विकास प्रशिक्षणाविषयी सादरीकरण केले. जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाल्याने त्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.विभागनिहाय स्पर्धा घेऊन प्रशिक्षणार्थ्यांची सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली. यात सेंट्रल बँक ऑफ इंडिया बुलडाणा आरसेटी येथील चार महिलांनी सहभाग घेतला. आरसेटीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थीची विभागीय स्पर्धा वाशिम येथील स्टेट बँक आरसेटी येथे घेण्यात आली. यामध्ये शिवणकाम, ब्युटी पार्लर, शेळी संगोपन आणि उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
Users Today : 39