बुलडाणा, दि. 25 : महाडीबीटी प्रणालीवरील महाविद्यालय स्तरावरील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज तात्काळ निकाली काढावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच बहुजन कल्याण इतर मागास विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परिक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले ऑनलाईन अर्ज महाविद्यालयांकडे पाठविले जातात. महाविद्यालय प्राप्त अर्जांची तपासणी करून पात्र अर्ज समाज कल्याण विभागाकडे पाठवितात. यातील त्रृटी असलेले अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनला परत पाठविणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यातील चार हजार 18 विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित ठेवण्यात आले आहे.यात स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा. एन. गावंडे विज्ञान आणि ए. गावंडे वाणिज्य महाविद्यालय, साखरखेर्डा, परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, चिखली, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव, पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर, व्यवस्थापन महाविद्यालय, खामगाव, आदर्श बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, डॉ. आर. एन. लाहोटी तंत्रनिकेतन, सुलतानपूर, गावंडे औषधनिर्माण महाविद्यालय, साखरखेडा, सहकार महर्षि भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, खामगाव, मॉडर्न डिग्री कॉलेज बुलडाणा, श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय, नांदुरा या महाविद्यालयांचे अर्ज प्रलंबित आहेत.अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित असलेल्या अर्जाची महाविद्यालयस्तरावर तपासणी करून पात्र अर्ज समाज कल्याण विभागाच्या लॉगीनला दि. 26 जानेवारी 2023 पर्यंत पाठविण्यात यावे. तसेच त्रृटी असलेले अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनला परत करण्याची कारवाई करण्यात यावी. अन्यता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवल्याप्रकरणी महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर राहणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
Users Today : 39