रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी
येथील स्थानिक सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे भारताचा प्रजासत्ताक दिन पारंपरिक पध्दतीने आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी मॉर्निंग स्टार मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटीचे सदस्य श्री राजेशजी लखोटीया सर व श्री. जितेन्द्रजी लखोटिया सर उपस्थित होते. सर्वप्रथम श्री राजेशजी लखोटिया सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या स्वागतानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या उपमुख्याध्यापक निमिता गांधीं मॅडम यांनी केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांद्वारे वेगवेगळी देशभक्तीपर गीत सुद्धा सादर करण्यात आली व देशभक्तीपर नृत्य सुद्धा सादर करण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार सुद्धा मान्यवरांच्या समोर व्यक्त केले यानंतर सेंट पॉल अकॅडमी हिवरखेडचे प्राचार्य श्री चंद्रकांतजी तिवारी सर यांच्या मार्गदर्शनात व नियोजनात
प्रजासत्ताक दिन सेंट पॉल अकॅडमी येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. जितेंद्रजी लखोटिया सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शाळेचे प्राचार्य श्री चंद्रकांतजी तिवारी सर यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री राजेशजी लखोटीया सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले
Users Today : 54