अकोट- खंडवा रेल्वे मार्गाच्या कामाला अखेर गती अकोट ते अडगाव व आमलाखुर्द ते तुकाईथड काम सुरू होणार

Khozmaster
3 Min Read
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी उत्तर ते दक्षिण भारताला जोडणाऱ्या सिकंदराबाद जयपूर ह्या ऐतिहासिक मीटर गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये कन्वर्जन करण्याचे काम अनेक वर्षांपासून टप्प्याटप्प्याने सुरू आहे.
 त्यापैकी अकोट ते आमलाखुर्द ह्या टप्प्याचे काम मेळघाटच्या अडचणीमुळे अजून पर्यंतही सुरू होऊ शकले नाही. परंतु आता अकोट ते आमलाखुर्द  ह्या टप्प्यातील ज्या ठिकाणी रेल्वेला भूमी अधिग्रहण करावयाचे नाही. त्यासाठी रेल्वे विभागाने  दि. 25 जानेवारी रोजीच्या वर्तमानपत्रात भारताच्या राष्ट्रपतींच्या वतीने निविदा आमंत्रित केले आहेत.
 दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद येथे मुख्यालय असलेल्या ने प्रकाशित केलेल्या निविदा सूचनांमध्ये महाराष्ट्रातील आकोट ते अडगाव आणि मध्यप्रदेशातील  तुकाईथड ते आमलाखुर्द या मार्गाच्या ब्रॉडगेजसाठी गेज परिवर्तनाचे काम आणि नवीन स्टेशन उभारण्याचा आणि इतर अनेक कामांचा  समावेश आहे.अकोट ते आडगाव ह्या 11.55 किमीच्या कामासाठी 180 करोड रुपयाचे अंदाजपत्रक आहे ज्यामध्ये अडगाव येथे नवीन स्टेशन उभारण्यात येणार आहे. सदर काम पूर्ण करण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे.
 तर दुसरीकडे तुकाईथड ते आमलाखुर्द ह्या 12.86 किमीच्या कामासाठी 260 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे. ज्यामध्ये या मार्गासह तू काहीतरी नवीन स्टेशन उभारणी करण्यात येणार आहे. या मार्गावर तापी नदीचा मोठा पूल सुद्धा होणार असून त्याकरिता या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी 24 महिन्यांचा अवधी देण्यात आलेला आहे. असा दोन्ही कामांसाठी  एकूण 440 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असून दीड ते दोन वर्षात सदर काम पूर्ण होणार आहे.
आता उर्वरित मार्ग हा हिवरखेड सोनाळा जामोद उसरणी खकणार तुकाईथड ह्या पर्यायी मार्गाने जाण्याचे निश्चित झाले असून हिवरखेड येथे जुन्या मार्गावर रेल्वे स्टेशन होणार नसून भूमी अधिग्रहणानंतर गावाच्या जवळपास नवीन ठिकाणी नवीन रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार आहे याचे स्पष्ट संकेत सूत्रांकडून मिळत आहेत.रेल्वे प्रेमींमध्ये आनंद उत्सव
काही दिवसांपूर्वीच हिवरखेड विकास मंच या संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मंत्र्यांना व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली होती. याची तात्काळ दखल घेत प्रधानमंत्री कार्यालयामार्फत रेल्वे विभागाला सदर अर्ज पाठविण्यात आले होते. आता या निविदा प्रकाशित झाल्यामुळे रेल्वे प्रेमींमध्ये आनंद व्यक्त केल्या जात असून हिवरखेड विकास मंच संयोजक धिरज संतोष बजाज यांचेसह पूर्णेश उपाध्याय शुजालपूर, शोएब वासेसा, सै. रियाज अली हिंगोली, अमोल इंगळे अकोला, श्याम आकोटकर बावणबीर, स्वप्निल देशमुख सोनाळा, विजय जितकर आकोट, सुरेश गिऱ्हे, प्रकाश शर्मा हिवरखेड इत्यादी शेकडो रेल्वेप्रेमी कडून समाधान  आणि आनंद व्यक्त केला जात आहे.
0 9 4 5 5 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *