प्रतिनिधी रामेश्वर वाढी
पातूर येथील नानासाहेब नगर ते भंडाराज डांबरीकरण रस्ता लोकार्पण सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य कार्यक्रम पातुर शिवसेना युवासेनेच्या वतीने करण्यात आला. सदर रस्ता हा नानासाहेब नगरामधूनच मुख्यतः जात होता या रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली होती गरोदर माता व वयोवृद्ध लोकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याने ॲम्बुलन्स सुद्धा येत नव्हती.या रस्त्यासाठी शिवसेनेने 2016 -17 मध्ये ढोल बजाव आंदोलन सुद्धा केले होते नितीन बाप्पू आमदार झाल्याबरोबर त्यांनी हा रस्ता करून दिला त्याबद्दल नानासाहेब नगर व या रस्त्याने जाणारे सर्व शेतकरी यांनी आमदार नितीन बापू देशमुख यांचे मनापासून व शाल व श्रीफळ देऊन आभार व्यक्त केले
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रवीभाऊ मुर्तळकर, माजी सभापती अरुणभाऊ कचाले, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष परसरामजी उंबरकर, देवलाल भाऊ डाखोरे युवासेना तालुकाप्रमुख सागर रामेकर, पातुर पंचायत समिती सदस्य गोपाल ढोरे, पंचायत समिती सदस्य झळपे साहेब, माजी नगरसेवक सुरेंद्र उगले,शिवसेना निवासी उपतालुकाप्रमुख अनिल निमकंडे, काशिनाथ घुगे, मेहफूस भाई, शिवसेना उपशहरप्रमुख शंकर देशमुख, विशाल तेजवाल, अजय पाटील ,दीपक देवकर, निरंजन बंड, सचिन गिरे, युवासेना शहरप्रमुख अब्दुल मुक्तार, युवा सेना उपतालुकाप्रमुख महेश कचाले सर्व शिवसेना युवासेनेच्या आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते
Users Today : 54