का. प्र.– 3 फेब्रुवारी चा दिवस मेहकर शहरासह राज्यात चर्चेचा ठरला होता ऐतिहासिक विजय महाराष्ट्र को ऑप बँकेचा निकाल जाहीर झाला. तो म्हणजे महाविकास आघाडीच्या 12 उमेदवारांना सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार खासदार यांचे बँकेवर प्रभुत्व असताना सुद्धा एकतर्फी हार पत्करण्याची वेळ संबंधितावर ओढवली होती. अर्थातच याला आर्थिक नियोजनाचा पर्याय देऊन बाजू सावरण्याचा केविलवाला प्रयत्न झाला होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मेहकर अर्बन को-ऑपरेटिव बँक मागील दोन दशकापासून प्रतापगडाच्या ताब्यात होती. राज्यात घडलेल्या एकाच रात्रीच्या नाट्यमय घटनेने राज्यभरातील शिवसैनिकांना द्विधा मनस्थितीत टाकले आहे. ठाकरे गटविरुद्ध शिंदे गट अशी राज्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकाच परिवारातील सदस्यांना ज्यावेळी वेगळं व्हावं लागतं त्यावेळी स्वतःच्या अस्तित्वाचा लढा हा दोन्ही बाजूने सक्षमताकदनिशी लढला जातो. परंतु बँकेच्या प्रकरणात हे चित्र राज्यभरातील लोकांना विचित्र पद्धतीने बघावयास मिळाले आहे. ते म्हणजे स्थानिक सत्ताधिक आमदार डॉक्टर संजय रायमुलकर, खासदार प्रतापराव जाधव यांचे जिल्हा परिषद,पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारांवर चांगली पकड आहे असे असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या बारा उमेदवारांना बिनविरोध निवडून देण्याची वेळ का आली हा प्रश्न गुढच आहे. याच प्रश्नाचे स्पष्टीकरण शोधत असताना काही महत्त्वाच्या नाट्यमय घडामोडी उघडकीस आल्या आहेत. बारा संचालक मंडळाच्या निवडीसाठी 7800 मतदारांना आपला हक्क बजावयाचा होता एकूण 36 अर्ज निवडणुकीसाठी दाखल करण्यात आले होते. महाविकास आघाडी कडून 14 तर तर खासदार समर्थक शिंदे गटाकडून बारा अर्ज दाखल करण्यात आले होते दहा अपक्ष अर्ज दाखल झाले होते. या 36 अर्जांमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांचा वैयक्तिक अर्ज सुद्धा दाखल करण्यात आला होता. या सर्व प्रक्रियेमध्ये ठाकरे गटाकडून उमेदवारी दाखल झालेल्या उमेदवारांपैकी बहुल मतदान असलेल्या गावातील लोकांनाच उमेदवारी देण्यात आली होती. उलट पक्षी बहुसंख्य उमेदवार हे मेहकर शहरातील सढन परिवारामधील होते.
त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करत असताना कोणत्याही पतसंस्थेचा थकबाकीदार नसावा अशा प्रकारचा नियम लागू करण्यात आला होता. बँकेने घेतलेल्या 2013 च्या ठरावानुसार 50 हजार रुपये फिक्स डिपॉझिट आणि दहा हजार रुपयांचे शेअर्स धारक व्यक्तीलाच उमेदवारी लढता येईल अशा प्रकारचा अथवा सुद्धा काढण्यात आला होता. परंतु नियमानुसार अशा प्रकारचे नियमावली जाहीर करताना बँकेच्या सर्व सभासदांना ती अवगत करावयाची असते. 2013 पासून केलेल्या या नियमाचे बहुतांश सभासदांना अनभिज्ञ ठेवण्याचे काम केले असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे आणि ह्याच फटीवर बोट ठेवून उभय पक्षाने दोन्ही जाचक नियम काढून टाकण्याचे ठरवले. परंतु बँकेच्या या नियमात धनाड्य लोकांनाच उमेदवारी देता येईल हे मात्र स्पष्ट होते गरिबांनी फक्त मतदान करून आपल्या काबाडकष्टाने कमवलेली माय पुंजी बँकेत नेऊन ठेवावी एवढाच अधिकार त्यांना दिला जातो हे मात्र विपरीतच आहे. बँकेचे शेअर होल्डर्स मेहकर लोणार सिनखेडराजा या तिन्ही तालुक्यातील आहेत. असे असताना सुद्धा विद्यमान सत्ताधारी लोकप्रतिनिधींना शहरातील लोकांचा कळवळा का आला हा प्रश्न अनुत्तरीत राहणार. अर्थातच यासंबंधी पत्रकार परिषद घेऊन खुलासा देण्यात आला आहे. बँकेवर निवडणुकीचा खर्च लादला जाऊ नये म्हणून सत्ताधारी पक्षाने या निवडणुकी मधून माघार घेतली असल्याचा प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला आहे. परंतु सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांचा आर्थिक निकष बघता ही बाब मनाला पटत नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीचा ऐतिहासिक बिनविरोध विजय झाला 3 फेब्रुवारी रोजी केवळ कार्यालयासमोर फटाक्याची आतिषबाजी करण्याखेरीज कोणत्याही प्रकारचा विजय जल्लोष महाविकास आघाडी कडून करण्यात आला नाही. शिंदे ठाकरे गटातील घमासान सुरू असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकतर्फी झालेला विजयश्री साजरा न करण्या इतपत हा विकास आघाडीचे मनोधैर्य खचले का? अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहे. लोक चर्चेनुसार या नाट्यमय निवडणुकीदरम्यान चर्चासत्र दबाव तंत्र मोठ्या प्रमाणात वापरले गेले परंतु विजयी झालेल्या पॅनल कडून याला दाद देण्यात आली नाही. निवडणुकीपूर्वी कमालीची एकनिष्ठ एकाग्रता असताना सत्ताधीशांच्या बुडाखालची खुर्ची काढून घेण्यात यश प्राप्त केल्यानंतर तो उत्साह कुठेतरी विरजण पडल्यासारखा आढळून येत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप,शिवसेना ठाकरे गट या दिग्गज पक्षातील अनेक उमेदवार विजयी पॅनल मध्ये आहेत. असे असून सुद्धा आपला विजय साजरा न करण्या इतपत हतबल परिस्थिती त्यांची झाली आहे का.? मेहकर शहरातच नव्हे तर जिल्हाभरात सुद्धा महाविकास आघाडीचे कोणत्याही प्रकारचा जल्लोत्सव आढळून आला नाही. राष्ट्रवादी, काँग्रेस भाजप या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मौन बाळगले आहे. अर्थातच बँकेच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारच्या पक्षाची प्रत्यक्षरीत्या सहभाग असल्याची परिस्थिती जाणवत नाही परंतु निवडणुका जाहीर झाल्यानंतर मात्र सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांना यथोचित पाठबळ देत असतात. एव्हाना शिंदे गटाला कडाडून विरोध करत असणारी महाविकास आघाडी बँकेच्या निकालाबाबत घेतलेली भूमिका मात्र संशयास्पदच आहे. मेहकर अर्बन को-ऑपरेटिव बँकेचा निकाल हा शिंदे गटातील प्रस्थापित लोकनेत्यांना घरचाच आहेर ठरला हे म्हणायला वावगं ठरणार नाही.
चौकट
महाविकास आघाडीचे उमेदवार
किशोर भास्करराव गारोळे मेहकर,सागर दिलीपराव पाटील लोणीगवळी,शेषराव राजाराम बदर सोनटी,अर्जुनराव रोडूजी वानखेडे बेलगाव,संतोषराव उत्तमराव मते,गजानन संभाजी आखाडे डोणगाव,प्रदीप माणिकराव देशमुख श्याम देवानंद निकम नायगाव द.परशुराम प्रल्हाद ठाकरे देविदास प्रल्हाद चानखोरे बोरी,कैलास शामराव सुखदाने मेहकर,लक्ष्मण पुंडलिकराव ठोकरे कल्याना,विमलबाई अर्जुन वानखेडे बेलगाव,अर्चना दत्तात्रय घनवट परतापूर,
शिंदे गट (खासदार +आमदार गट )
प्रतापराव गणपतराव जाधव गणपतराव श्रीपतराव रहाटे प्रकाश बन्सीलाल चौधरी रामकिसन रामप्रसाद काबरा रवी कुमार कुंजबिहारी अग्रवाल विष्णू किसनराव बाजड संजय केशवराव जागृत अंजली अजय उमाळकर तारा केशव पटेल अनिल दत्तात्रय नखाते विलास रावजी मोहरूत अशोक भिकाजी पसरटे
अपक्ष उमेदवार
शेख इजाज शेख मुख्तार
अस्मा अशी शेख इजाज वामन कुंडलिक दळवी पांडुरंग रामचंद्र देशमुख परशुराम प्रल्हाद ठाकरे हानीफ रण्णू गवळी, रामेश्वर विश्वनाथ साखळकर साहेबराव नामदेव घनवट पांडुरंग वसंतराव खबाले विष्णू वानखेडे
एकूण मतदार 7800 लोणार,मेहकर सि.राजा तालुक्यातील
सर्वसाधारण 7 जागेसाठी 22 अर्ज दाखल
अनुसूचित एका जागेसाठी दोन अर्ज दाखल
विमुक्त भटक्या एक जागेसाठी जातीसाठी तीन अर्ज
इतर मागास प्रवर्गा मधून एक जागेसाठी पाच अर्ज
महिलांमधून दोन जागेसाठी चार अर्ज
आर्थिक निकशापोटी बँकेची निवडणूक बिनविरोध झाली असल्याचा खुलासा. निवडणूक निकाल जाहीर होताच 3 फेब्रुवारी नंतर आठवड्याभरातच बँकेमधून पावणे पाच कोटी रुपये याच पॅनल मधील खासदार प्रतापराव जाधव, गणपतराव रहाटे,रवी अग्रवाल या लोकांनी काढून घेतले..! अशा प्रकारचा आरोप ठाकरे गटांकडून करण्यात आला आहे.
विजय झालेलं संचालक मंडळ म्हणजे खासदार जाधव यांची बी टीम तर नाही ना.. जनतेत उलट सुलट चर्चा
मेहकर अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या निकालाने एकतर्फी विजय प्राप्त झालेल्या महाविकास आघाडी बाबत शहरात तर्कवितर्क राबवले जात आहे महाविकास आघाडीच्या अकरा विजयी उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा राजकीय जल्लोष अथवा स्वतःचा उदो उदो केला नाही सत्ताधारी लोकांच्या प्रभावापुढे हातबल झाले अथवा विजयश्री साजरा करण्यात कुमक नसल्याचा पवित्रा घेतला आहे का? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा बल प्रयोग करून विजय झाल्यानंतर सुद्धा राजीनामा घेण्यात आला आहे. हे सर्व गोड बंगाल महाविकास आघाडीच्या तंबूत सुरू आहे. निवडणुका लढण्यापूर्वीचे नियोजन आणि विजयश्री प्राप्त केल्यानंतर चे नियोजन यामध्ये कुठेतरी पाणी मुरत असल्याची दबी चर्चा गावभर पसरली आहे.
ही तर खासदार महोदयांची खेळी नाही ना..!
35 वर्षाचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असताना. आज पर्यंत अनेक दिग्गजांना पराभवाची धूळ चारली परंतु स्वतःच्या कर्म जन्मभूमीत छोट्याशा बँकेच्या निवडणुकीत माघार घेण्याची वेळ खासदार जाधवांना यावी हे सर्वसामान्य जनतेस पचण्या योग्य नाही. लोक चर्चेनुसार ठाकरे गटातील किशोर गारोळे यांना नेतृत्व देऊन धर्मवीर दिलीपराव रहाटे यांचे सुपुत्र आशिष रहाटे यांना चेकमेट देण्याचा हा खेळ असल्याचे बोलल्या जात आहे. आगामी विधानसभा निवडणुका खुल्या प्रवर्गामधून जाहीर झाल्या खासदार पुत्र ऋषी जाधव यांना आमदारकीसाठी प्रत्यक्ष आव्हान देण्याचे धाडस यथाशक्ती माजी जिल्हा परिषद गटनेते आशिष रहाटे बाळगून असल्याची चर्चा सर्वसामान्य मतदारांमध्ये जोर धरून आहे. याच अनुषंगाने भविष्याचा विचार करून एकाच गटात डिव्हाइड अँड रुल ही इंग्रज पॉलिसी वापरून खासदार जाधव यांनी डाव साधला आहे.अशा प्रकारची चर्चा सर्वसामान्य मतदार मध्ये होत आहे.
Users Today : 66