गजानन माळकर,तालुका प्रतिनिधी मंठा,
मंठा शहरातील अवैद्य धंद्यांला लगाम लागेना याउलट नव्या अवैद्य धंद्याला उभारी आली आहे.पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अवैध धंद्यांना पुन्हा उभारी घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांनी विशेष पोलीस नेमणूक करून या अवैद्य धंद्यावर कारवाईचे सत्र सुरू करावे अशी मागणी नागरिकांत जोर धरत आहे.
मंठा तालुक्यासह शहरात अवैध धंदे बोकाळले आहे.मंठा शहर व तालुक्यात गुटखा , मटका , अवैद्य दारू ,अवैद्य प्रवासी वाहतुक , जुगार , ऑनलाईन मटका व ऑनलाईन चक्री अवैध वृक्षतोड यासह बस स्थानक परिसरातील विनापरवाना ऑनलाइन लॉटरी अशी अवैध धंदे सुरू झाली आहेत.यासह विविध अवैद्य धंद्याचे मंठा माहेरघर झाले आहे.
मंठा शहरासह परिसरात शासनाने बंदी घातलेला गुटखा प्रत्येक किराणा , पानठेल्यावर शहरात खुल्लेआम विक्री होत आहे. शहरांमध्ये तीन गुटखा माफियांनी हौदोस घातला आहे. पोलिसांशी जवळीक साधून दिवस-रात्र गुटख्याची वाहतुक होत आहे. ग्रामीण भागात गुटख्याच्या मोठ्या गाड्या येतात , रातोरात पिकअप व वाहनाने हा गुटखा खेडोपड्यात पार्सल करण्यात येतो.याकडे सोयीस्कर पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे.
शहर व तालुक्यात सकाळी व संध्याकाळी दुचाकीवरून अवैध दारू मोठ्या प्रमाणावर पार्सल केली जात आहे.विशेष म्हणजे याची पूर्ण माहिती स्थानिक प्रशासनाला असते,परंतु त्यांच्याकडून कारवाई होत नसल्याने प्रत्येक गावगाड्यात अवैद्य दारू पार्सल होत आहे.यांना पाठबळ व अभय कोणाचे हा मोठा प्रश्न उभा राहत आहे.यासह शहरात व ग्रामीण भागात ठिकठिकाणी जुगाराचे अड्डे आहेत.शहरातील कन्या शाळा परिसर , बसस्थानक परिसर , मंठा फाटा यासह ठिकठिकाणी मोबाईल मटका घेण्यात येतो.यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.तरी कारवाई करण्यास अखडता हात दिसत आहे. मंठा शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैद्य प्रवासी वाहतूक बोकाळली आहे. यामुळे प्रवासी नागरिकांचे जीव धोक्यात येत आहे. आर्थिक हव्यासापोटी अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर शहरांमध्ये बोकळलेली दिसून येत आहे.तरी याकडे स्थानिक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मंठा बस स्थानक परिसरामध्ये ऑनलाइन मटका , ऑनलाइन चक्री याच्याकडे मोठ्या जोमाने राजरोसपणे सुरू आहेत विशेष म्हणजे याबाबत तक्रारी करू नये कुठलीच कारवाई होत नसल्याने नागरिक तक्रार करण्यास बजावत आहेत. वरील सर्व धंद्याचे हप्ते जमा करण्यासाठी चार पोलीस कर्मचारी व खाजगी व्यक्तीची नेमणूक केली असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
मंठा शहरात अवैध धंदे धारकाची अरे रवी वाढली आहे पोलिसांना हाताशी धरून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम होत आहे.
शहरातील अवैद्य धंद्यांला मोठे उधान आले असून यावर आळा घालण्यासाठी पोलीस महासंचालक
यांनी मंठा तालुक्यात विशेष लक्ष घालून अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी विशेष पथक नेमणूक कार्य करावी अशी नागरिकांतून जोर धरत आहे.