प्रविण चव्हाण (जिल्हा प्रतिनिधी )
दि.18 फेब्रुवारी.
नंदुरबार -: दि.17 फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बैलचा आठवडे बाजार भरला असता त्या बाजारात रोहीदास नथा पाटील रा.शिरसमनी ता.पारोळा यांचे पाकीट हारले असता ते पाकीट बाजार समितीचे वाचमन कृष्णा पांडुरंग मराठे याना सापडले त्यांनी बाजार समितीचे सहा.सचिव हेमंत चौधरी यांचा कडे दिले .
त्यांनी रोहीदास पाटील यांना मोबाईल ने संपर्क केला. व त्यांना सपूर्त केले त्या पाकीट मध्ये 82000/- इतकी रक्कम होती ,सध्याच्या युगात पैशासाठी आप आपसात भांडत होताना दिसत नागरिक लबाडी करून पैसे कमवण्याचा मागे लागले आहेत परंतु मार्केट कमिटी मध्ये वॉचमणी करून आपला उदरनिर्वाह भागवणारे व्यक्तीने 82000 कोणताही लोभ न बाळगता स्वतःजवळ न ठेवता परत दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
Users Today : 66