अकोला जिल्हा प्रतिनिधी रामेश्वर वाढी
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.) संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही कार्य सन्मान पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्थांना हे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. ज्येष्ठ पत्रकार दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दिनांक 26 फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी 11 ते 2 वेळात मान्यवरांच्या उपस्थितीत के जे मेहता कॉलेज येथील शुभेंधू सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुरस्कार प्राप्त पत्रकार तसेच सामाजिक संस्थांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
सर्वस्वी पत्रकार अश्विनी पांडे, निलेश तांबे, अरुण मलानी , हर्षवर्धन बोऱ्हाडे , अरुण बिडवे ,अब्दुल कादिर , मनोज घोणे , रमेश पडवळ , प्रशांत धिवंदे , कुंदन राजपूत , दिलीप कोठावदे , ताऊसिफ शेख , गौतम पगारे, नितीन चव्हाण , वसीम शेख , परमेश्वर आंधळे , अनिल गुंजाळ , विलास सूर्यवंशी , अजय भोसले , प्रकाश उखाडे , सुनीता पाटील , संजय परमार , तबरेज शेख , अभिजीत सोनवणे , मनोहर गायकवाड , राजेंद्र साखरे , जगदीश सोनवणे , विश्वास लचके , संदेश केदारे , गोकुळ लोखंडे , नंदू नरवडे , इंडिया दर्पण परिवार, पत्रकार विजय गोळेसर , प्रदीप जगताप , नरेंद्र दंडगव्हाळ , अरुण तुपे , नंदकिशोर गांगुर्डे , चैतन्य गायकवाड , संजीव परदेशी , संतोष लोळगे , करणसिंग पवार , गणेश खरात गोविंद तुपे (जीव रक्षक) पुनम टिळे (सेंद्रिय शेती तज्ञ) मनीषा शिर्के (वृत्तपत्र विक्रेता) संजय लोळगे (वृत्तपत्र डिझायनर) राजेश आंधळे (जागरूक ग्राहक सेवा मंच) कवी जगदीश देवरे, याबरोबरच नाशिकरोड येथील अखिल भारतीय अपंग पुनर्वसन शिक्षण संस्था, ज्ञानेश्वर गवळी तंटामुक्त समिती, देवांग जानी-गोदाप्रेमी सेवा समिती, हिंदुस्थान स्काऊट अँड गाईड – नाशिक , जनस्थान संस्था, पूज्य सिंधी पंचायत (देवळाली कॅम्प), शिक्षण मंडळ संस्था भगूर, आकाशवाणी केंद्र नाशिक, साने गुरुजी शिक्षण मंडळ नाशिक रोड, सिंधू समाज मंडळ (देवळाली कॅम्प), नामको बँक (पुणे रोड शाखा), ए. जी. म्युझिक अकादमी, श्री दत्त पेट्रोल पंप देवळाली कॅम्प यांचा गौरव केला जाणार आहे. सन्मानचिन्ह ,शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या शासकीय विश्रामगृह नाशिक येथे झालेल्या कार्यसन्मान पुरस्कार समिती बैठक प्रसंगी अध्यक्ष दिनेशपंत ठोंबरे कार्याध्यक्ष मंगलसिंह राणे, उपाध्यक्ष लियाकत पठाण, उपाध्यक्ष पंकज पाटील, संघटक करणसिंग बावरी, ताऊसिफ शेख, कादिर पठाण, वसीम शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
Users Today : 49