प्रतिनिधी रामेश्वर वाढी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आंबेडकर)च्या अकोला जिल्हाध्यक्षपदी सुनील अवचार यांची निवड करण्यात आली आहे,10 मार्च 2023 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे, तथा राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांच्या आदेशानुसार, राज्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी अकोला जिल्हा प्रभारी सचिन कोकणे यांनी, अकोला शहरातील हॉटेल ग्रीन लँड कॉटेज मध्ये झालेल्या बैठकीत नियुक्ती पत्र देऊन,सुनील अवचार यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली.सुनिल अवचार यांनी यापूर्वी रामदास आठवले यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद आणि इतरही महत्वाचे पदे सांभाळलेली असल्याने, आणि जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने, पक्ष बांधणी करतील. या बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष अजय प्रभे , जिल्हा उपाध्यक्ष पंजाबराव किर्दक, तेजराव गवई, गौतम अनभोरे, राजकुमार वानखडे, संतोष कोकणे, आशिष डोंगरे, विलास वानखडे, कमलकिशोर भरतीया,सरीता मनवर ,अनुरिती गुहे तथा पदाधिकारी,कार्यकर्ते महीला पदाधिकारी,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Users Today : 47