अवकाळी पावसाने गहू पिकाचे नुकसान

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी विशाल गवई अकोट 

अकोट  –   तालुक्यातील आकोलखेड,आकोली जहाँगीर,अंबोडा,दहिखेल फुटकर,पोपटखेड शेतशिवारात ता.१५ मार्च रोजी रात्री पडलेल्या पावसाने गव्हाचे पिक हे काढणीवर आले असताना अवकाळी पावसाने गहू झोपला आहे.त्यामुळेशेतकऱ्यांना मोठी आशा गहू उत्पादनातून त्यापासून सुध्दा पावसाने हातचे पिक उध्वस्त झाले आहे.गव्हाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत.शेतकरी मोठ्या आशेने गव्हाच्या पिकाकडे बघत होता.परंतू रात्री अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने गहू झोपला असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.दुष्काळाची शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई सुध्दा अजून पर्यंत मिळाली नाही.त्यातचं शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करुन तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी जेणेकरून शेतकरी निराशातून बाहेर पडेल.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *