रितेश टीलावत तेल्हारा प्रतिनिधी
हिवरखेड- येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुनील रामकृष्ण राऊत यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या श्रीमती रतनबाई ताराचंद कानुंगा वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी २१ हजार रुपयाची देणगी देऊन आपल्या दानशूर व्यक्तित्वाचा परिचय करून दिला.
या वाढदिवासाच्या अभीष्टचिंतन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे, प्रमुख उपस्थिती जेष्ठ संचालक प्रकाश खोब्रागडे, माजी सरपंच मिलिंदकुमार भोपळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा, नितीन वानखडे, रणजीत भोपळे,सुभाष भड हे होते. यावेळी सुनील राऊत व प्रा. निखील भड यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन संतोषकुमार राऊत तर आभारप्रदर्शन अमोल दामधर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र भोपळे कॉलेजचे साहाय्यक प्रा.गणेश भोपळे, समंत्रक प्रा.मनीष गौरद व अनंता भोपळे यांनी प्रयत्न केले.
Users Today : 23