जि प व प्रा शाळा कार्ला बु येथे डिजीटल क्लास रुमचा विद्यार्थी अर्पण सोहळा संपन्न

Khozmaster
2 Min Read

 

रितेश टीलावत 

तेल्हारा प्रतिनिधी कार्ला बु: – जि प व प्रा शाळा कार्ला बु येथे शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री नरेशजी टिलावत यांच्या विशेष सहकार्याने एक वर्ग खोली डिजिटल करण्यात आली असून ती डिजिटल वर्ग खोली विद्यार्थी हे दैवत समजून त्यांना अर्पण करण्यात आली या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सुनिताताई प्रविणजी खंडेराव तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्री गजाननभाऊ काकड, उपसरपंच सौ माधुरीताई सपकाळ,केंद्र प्रमुख श्री मनीषजी गि-हे,माजी मुख्याध्यापक श्री नरेशजी टिलावत, शुभमजी टिलावत ग्रा पं सदस्य सौ आरतीताई जवंजाळ,सौ जानीताई कोष्टी शा व्य समिती सदस्य श्री संतोषभाऊ भराटे

अंगणवाडी सेविका सौ सुषमाताई बाजारे, सौ अपर्णाताई भराटे,पालक प्रतिनिधी सौ मनोरमाताई सपकाळ शिक्षणप्रेमी श्री रमेशजी मानकर उपस्थित होते. शिक्षणामुळेच माणसाला माणूसपण येते व त्याची वैचारिक प्रगल्भता वाढून त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य रुजल्या जाते, त्यात जर डिजीटल शिक्षणव्यस्थेची भर पडली तर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता अधिक विस्तारित होतात व कोणताही घटक ते सहजपणे अवगत करु शकतात त्यासाठी अधिक मन लावून अभ्यास करावा व आपले ध्येय गाठावे असे प्रतिपादन याप्रसंगी जि प सदस्य श्री गजाननभाऊ काकड यांनी व्यक्त केले सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर डिजिटल क्लास रुमचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजीटल अध्ययन साहित्य प्रदान केल्यामुळे शाळेचे सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक श्री नरेशजी टिलावत व सौ सरोजताई नरेशजी टिलावत यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद अकोला तर्फे उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार मिळाल्यामुळे सौ अपर्णाताई भराटे अंगणवाडी सेविका यांचा सत्कार करण्यात आला केंद्रप्रमुख श्री मनीषजी गि-हे व सौ मनोरमाताई सपकाळ यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले डिजिटल क्लासरुमचा विद्यार्थी अर्पण सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सरोजताई टिलावत यांच्या मार्गदर्शनाखाली सौ सुनिताताई गि-हे, कु विजयाताई खंडारे,श्री संजयजी राठी, श्री संदीपजी जाधव,श्री रमेशजी मानकर व विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक अध्यापक श्री दिनेशजी शेंगोकार यांनी , तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री उमेशजी तिडके यांनी व्यक्त केले

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *