रितेश टीलावततेल्हारा प्रतिनिधी
विदर्भ कोंकण ग्रामीण बँक शाखा हिवरखेड ला कमांडर ऑफ फेब्रुवारी 2023 घोषित करण्यात आले आहे.
विदर्भ कोंकण ग्रामीण बँक कर्ज वसुली विभाग मुख्यालय द्वारा दर महिन्याला घेतल्या जाणाऱ्या कर्ज वसुली स्पर्धे मध्ये अकोला क्षेत्र मधील हिवरखेड शाखेला कमांडर ऑफ फरवरी 2023 घोषित करण्यात आले. हिवरखेड शाखेचे शाखा व्यवस्थापक अमोल कदम तसेच त्यांचे सहकारी पवन वाकोडे , उमेश केराम , पवन सोनवणे, अजय मस्के या सर्वाची कठोर मेहनत आणि अथक परिश्रम ने फेब्रुवारी 2023 मध्ये 65 लाख एनपीए कमी करण्यात शाखा यशस्वी झाली आहे.बँक चे अध्यक्ष विजयकुमार वर्मा , महाप्रबंधक विमल कुमार, तथा महाप्रबंधक अनिल कुमार श्रीवास्तव यांनी शाखा प्रबंधक व सर्व सहयोगी यांचे अभिनंदन केले आहे. 31मार्च 2023 मध्ये एनपीए वसुली मध्ये अधिक जास्त मेहनत घेवुन शाखेला मजबूत बनविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील असा विश्वास विदर्भ कोंकण ग्रामीण बँक हिवरखेड शाखा व्यवस्थापक अमोल कदम यांनी व्यक्त केला आहे. हीवरखेड शाखेला मिळालेल्या या सन्मान बदल सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे.
Users Today : 23