वासुदेवाच्या कलेतून व मूक नाटकेतून दिला चिमणी व वन्यदीन पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Khozmaster
2 Min Read

युवा कलाकार पर्यावरण प्रेमी वन्यजीव स्वरक्षक सर्पमित्र प्रदीप पट्टेबहादूर यांचा पुढाकार”

वाशिम प्रतिनिधी ; मानवी जीवनाच्या उदरनिर्वाहासाठी व सोई सुविधेसाठी गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरणाचा ऱ्हास करत जंगलतोड होत आहे. आणि या होत असलेल्या जंगल तोडीमुळे पर्यावरणाच्या कमतरतेमुळे वन्यजीव व मानवी जीवनाच्या जीवन प्रणालीवर अनेक समस्या या उद्भवत आहेत. याचे कारण म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास आणि प्रदूषण होय. वन्य जीवाचे व पर्यावरणाचे संवर्धन झाले पाहिजे याकरिता युवा सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण प्रेमी वन्यजीव संरक्षक युवा कलाकार प्रदीप पट्टेबहादूर यांनी वासुदेवाच्या वेशभूषा परिधान करून वृक्षतोड,वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास अशा विविध विषयावर जनजागृती करीत पाणी आडवा पाणी जिरवा जलसंवर्धन पर्यावरण संवर्धन वन्यजीवांचे रक्षण चिमणी व इतर पाखरांसाठी पाणी व खाद्यपदार्थांचे व्यवस्थापन केले पाहिजे. याकरिता वीस मार्च जागतिक चिमणी दिन व 21 मार्च जागतिक वन दिन निमित्त ग्रामीण भागामध्ये व वाशिम शहरांमध्ये जनजागृती करण्यात आली. या मध्ये नाटिका सादर करीत जंगल तोड व पाण्याचा अपय यावर नाटिका सादर करून एक सकारात्मक संदेश दिला.आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला दोखा निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी व पर्यावरण आणि वनांचा मानवी जिवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण,संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी या वासुदेवाच्या कलेतून व मूक नाट्यातून जनजागृती कोडाळा झांमरे येथे करण्यात आली.

 यामध्ये युवा कलाकार प्रदीप पट्टेबहादूर, ऋषिकेश खंदारे, रामेश्वर झांमरे, निकिता पट्टेबहादूर आकांक्षा गायकवाड राणी सरकटे, किरण पाईकराव साक्षी मोरे या सर्व कलाकारांनी कलेच्या माध्यमातून जागर केला. या मध्ये श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना पथक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. भारती देशमुख मॅडम व प्रा.विजय वानखेडे यांनी सहकार्य मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन युवा कलाकार सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण व वन्यजीव रक्षक सर्पमित्र तथा राजा प्रसेनजीत अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था प्रतिनिधी व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकतउमरा अध्यक्ष प्रदीप पट्टेबहादूर यांनी केले होते.

0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *