वाशिम बार्टी केंद्राचा आय.बी. पी.एस.पूर्व प्रशिक्षणाचा प्रशिक्षणार्थ्यांनी घेतला निरोप

Khozmaster
2 Min Read

वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर*

वाशिम : बार्टी अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (पुणे) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन व प्रसंग मागासवर्गीय समाज कल्याण संस्था वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निशुल्क असे स्पर्धा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण दिले जाते त्याच अनुसंगाने सहा महिन्याच्या तुकडीचे आज दिनांक २१ मार्च २०२३ रोजी निरोप समारंभाचा कार्यक्रम अकेडमीचे संचालक डॉ . गजपाल पी . इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पी.आय.) रफिक शेख सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले . यावेळी ते म्हणाले कि जर यश मिळवायचे असेल तर प्रयत् ,सातत्य आणि उतुंग

इच्छाशक्तीच्या बळावर आपण आकाशाला सुद्धा गवसणी घालू शकतो . सातत्य व महत्वाकांक्षा हेच कुठल्याही येशाचे गमक आहे. असेही प्रतिपादन त्यांनी केले.व बार्टीच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. आणि विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी सुभेच्छाही दिल्या.कार्याक्रमचे अध्यक्ष डॉ. गजपाल पी. इंगोले यांनी आपल्या प्रवर्गातील उमेदवारांना बार्टीकडून देत असलेल्या या प्रशिक्षनाची प्रसंशा केली. व बार्टी चे समातामुलक समाज घडवण्याचे कार्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश समाजातील तरुणांनी “ मोक्याच्या जागा हस्तगत करा “ याचे तंतोतंत पालन बार्टी कडून होत आहे याचे समाधान व्यक्त केले.आणि प्रशिक्षणार्थ्यांना स्पर्धा परीक्षा करत असतांना येणाऱ्या अडचणीसाठी मी स्वतः आपल्या पाठीशी असेन असेही प्रतिपादन केले . व पुढील भविष्यासाठी खूप खूप सुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामध्ये नृत्य कला,नाटक कला,गीत गायन अशा अनेक कला सदर केल्या गेल्या , यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनि सहभाग नोंदविला दरम्यान विद्यार्थ्यांच्या जेवणाची उत्तम सोय करण्यात आली नंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले अशाप्रकारे कार्यक्रम आनंदात पार पडला. व सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांचा निरोप घेतला.

 

0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *