रितेश टीलावत
तेल्हारा प्रतिनिधी
मौजे खाकटा येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत सलग मुंग या बाबी अंतर्गत शेतीदिन घेण्यात आला. सदर कार्यक्रमात नरेंद्र राठोड तालुका कृषी अधिकारी तेल्हारा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून डॉ. चारुदत्त ठीपसे विशेष विषय तज्ञ कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी मार्गदर्शन केले असुन डॉ. ठिपसे यांनी संपूर्ण पीकांचे लागवड पासून उत्पादन पर्यंत चे
तंत्रज्ञान बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. व पुढील हंगामासाठी बियाणे लागवड पासून ते पिक काढणी पर्यंत उत्पादन खर्च कसा कमी करावा व उत्पन्न कसे वाढवावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याबाबत शेतकऱ्यांशी विश्लेषणात्मक सविस्तर चर्चा केली. मंडळ कृषी अधिकारी कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शाश्वत शेती उत्पादन कसे मिळवता येईल याबद्दल सविस्तर माहिती दिली .कार्यक्रमास प्रशिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले व अल्पोपहार देण्यात आले.सदरच्या कार्यक्रमास ग्राम पंचायत सदस्य राझीक पटेल मंनान पटेल, शेख रियाज शेख इद्रिस, जूनैद खान सलाम उल्ला खान, रफिक पटेल गुलजार पटेल,सुरेश गणेश गवारगुरू, आम्रपाली गवारगुरू, आशा दुबे हमिदाबी बेग, फरिदा बी, आईशा बी अफरोज खा, कृषी सहाय्यक एस. डी. ठोंबरे, एस.व्ही.मेघ, समूह सहाय्यक गोपाल लादे,एस.के. तायडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा दीपक मोगरे व गावातील बहुसंख्य शेतकरी कार्यक्रमाला उपस्थित होते.
Users Today : 19