वाशिम बिलाल नगर येथील घटना
वाशिम ; दि.२३, शहरातील बिलाल नगर येथे राहत असलेल्या रुबीना.बी.शेख राहणार बिलाल नगर वाशिम यांचा सख्ख्या पोरीच्या नवऱ्याने म्हणजेच जावयाने डोक्यामध्ये फाऊडे मारून खून केल्याची धक्कादायक घटना ही आज दिनांक २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास समोर आली आहे. यामध्ये जावई बायको व सासू मध्ये वाद झाला होता . आणि जावई हा बायकोच्या घरी आला आणि त्यामध्ये त्यांचे रूपांतर हे वादामध्ये झाले. आणि या वादामध्ये सासूचा खून झाल्याचे समोर आले आहे.. सदर जावई हा नामे हाफिस शेख प्रवीण शेख, राहणार नांदापूर सेलू बाजार जवळ , तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील असून तो वाशिम येथे राहत होता.
सदर घटनाही वाऱ्यासारखी पसरतात घटनास्थळी वाशिम पोलीस स्टेशनचे पी.आय रफिक शेख व API इंगळे आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर महिलेला ॲम्बुलन्स मध्ये टाकून क्रिटिकल केअर वाशीम येथे दाखल करण्यात आले होते. परंतु यामध्ये मृत्यू झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले. यामध्ये मृतक महिला रुबिना.बी.शेख यांच्या मुलगी तिची देखील प्रकृती खूप गंभीर असल्यामुळे तिला देखील अकोला येथे पाठविण्यात आले. सदर आरोपी जावई हा घटनास्थळापासून फरार झाला आहे.परंतु अध्यापक ही वादाचे व मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही.या सदर घटनेचा तपासा वाशिम शहर पोलीस स्टेशन अंतर्गत ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
Users Today : 25