प्रतिनिधी रामेश्वर वाढी
ऐतिहासिक ,पौराणिक वारसा लाभलेलं हे शहर पावन झालय ते अनेक धार्मिक स्थळांनी ….,निर्सगाच्या कुशित लपलेले सोपिनाथ महाराज व नानासाहेब मंदिर,उंच टेकडी परिसरावर वसलेले श्री. रेणुका माता मंदिर व पातूर शहराच्या मध्यभागी वसलेले पातूरचे
आराध्य दैवत संत श्री. सिदाजी महाराज मंदिर.. आदी सर्व पातूरची ऐतिहासिक स्थळं भाविक भक्तांचे चित्त वेधुन घेतात ….!
शहराच्या मध्यभागी पातुर शहराचे आराध्य दैवत संत श्री.सिदाजी महाराजांचे आकर्षक व भव्य मंदीर उभारल्या गेले आहे. हे भव्य आकर्षक मंदिर १९५७ साली बांधण्यात आले असुन मंदिरासोबतच भव्य असा सभामंडपसुध्दा उभारण्यात आला आहे.अशा सुंदर व आकर्षक मंदिरात उत्कृष्ट कुशलतेने घडविलेली संत श्री.सिदाजी महाराजांची कृष्णवर्णी मुर्ती भाविक भक्तांना आकर्षूण घेते.पातूर येथिल सुप्रसिध्द शिल्पकार स्व.वामणराव वडतकार यांनी सतत दोन ते तीन वर्ष अथक परिश्रम करुन ही आकर्षक मुर्ती घडविली आहे.
संत श्री.सिदाजी महाराजांचा जन्म सतराव्या शतकात माहोकारांच्या कुळात झाला.त्यांच्या वडीलांचे नाव राघोजी माहोकार व आईचे नाव अलोकाबाई होते.संत श्री.सिदाजी महाराज हे जन्मताच अवलिया होते, परंतू त्यांचे महात्म्य लोकांना समजले नाही.संत श्री.सिदाजी महाराजांनी अनेक अलौकिक
चमत्कार दाखविल्यानंतर लोकांना महाराजांचे महात्म्य कळुन चुकले.
संत श्री.सिदाजी महाराज १८१२ मध्ये समाधिस्त झाले,समाधिस्त होण्याच्या दोन वर्षापुर्वी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संत सिदाजी महाराजांचा टाळ व अतिभव्य असा ध्वज उभारण्यात आला.
गुढीपाडव्यापासुन ते दहाव्यादिवसापर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम घेऊन हा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो.या दहादिवसाच्या कार्यक्रमाने पातूर नगरी भक्तिमय वातावरणात दुमदुमून जाते.दुरून दुरून भाविक भक्त सिदाजी महाराजांच्या दर्शनाकरिता येतात.गुढीपाडव्यापासून दहावा दिवस म्हणजे महाराजांच्या सप्ताहाचा समारोप व भव्ययात्रा महोत्सव.यादिवशी दुपारी १२ वाजता दहीहांडीचा कार्यक्रम साजरा केला जातो. पातुर येथील भोई समाजाचे श्री.जानकिराम इंगळे (भोई) यांनी सन १९७२ साली चंदनाची पालखी अनोखी भेट म्हणून संत श्री सिदाजी महाराज संस्थान ला दान दिली होती. ती आजही शाबुत आहे. जानकिराम इंगळे (भोई) यांनी भेट दिलेल्या चंदनाच्या पालखीतुन गेले कित्येक वर्षांपासून सिदाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात येते. यात्रेच्या दिवशी संध्याकाळी संत श्री महाराजांची प्रतिमा चंदनाच्या पालखीतुन कीर्तन भजन टाळ , मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा मिरवणूक पातुर शहरात काढली जाते. अशा भक्तिमय वातावरणात पातुर नगरी दुमदुमली जाते. तसेच संध्याकाळी ६ वाजता
भव्यमहाप्रसादाचा कार्यक्रम विविध संघटनांच्या व नागरिकांच्या सहकार्याने साजरा केला जातो.
दरवर्षीप्रमाने या वर्षीसुध्दा संत श्री.सिदाजी महारजांच्या यात्रेच्या सप्ताहाची सुरवात दि.२२ मार्च ला गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त झाला असुन या सप्ताहाचा समारोप व भव्य यात्रा महोत्सव तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम दि.३१ मार्च रोजी पातूर येथे साजरा होत आहे.त्यानिमित्त संत श्री.सिदाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम…!
Users Today : 44