पत्रकार हा अन्यायाला वाचा फोडदून लोकांना नवी दृष्टी – डोळस करून लोकशाहीला बळकट करतो – प्रदिप पट्टेबहादुर*
वाशिम प्रतिनिधी ; दिनांक १ एप्रिल, पत्रकारांनी प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भिडपणे, सद्सत् विवेक जागृत ठेऊन ज्यांना स्वत:चा आवाज नाही, त्यांचा आवाज होऊन त्यांच्या मूक आवाजाला निर्णय कर्त्यांपर्यंत, बहुसंख्याकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे पत्रकार करत असतो. म्हणून पत्रकारांनी समाजाचा मूकनायक व्हावं. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वृत्तपत्राचं नावं ‘मूकनायक’ ठेवलं होतं.पत्रकार हा लोकांना नवी दृष्टी देऊन, लोकांना डोळस व लोकशाहीला बळकट करण्याचे कार्य करीत असतो. अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी विद्यार्थ्यांना प्रदीप पट्टेबहादूर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथील बी.एस डब्ल्यू भाग १ सत्र दोन च्या विद्यार्थ्यांना बातमी लेखन या अभ्यासक्रमीय भागामध्ये बातमी म्हणजे काय बातमी लेखनाची पद्धत आणि बातमी लेखन यावरती त्यांनी विद्यार्थ्यांना बातमीचे शीर्षक ,बातमीचा स्त्रोत वार्ताहर,प्रतिनिधी,बातमीची स्थळ, मुख्य बातमी, या पद्धती विषेद करून मार्गदर्शन केले. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा. गजानन बारड, प्रमुख मार्गदर्शक वंदे भारत वृत्तवाहिनीचे वार्ताहर तथा खोज मास्टर या वृत्तपत्राचे प्रतिनिधी युवा पत्रकार प्रदीप पट्टेबहादूर, प्रमुख उपस्थित प्रा.पंडित नरवाडे, प्रा.डॉ.प्रसेनजित चिखलीकर व फिल्ड वर्क क्षेत्रकार्य समन्वय प्रा.डॉ.जयश्री काळे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.अभय साबळे, शुभांगी राठोड,श्रुती इंगळे, दुर्गा लठाड,शिवकन्या धोंगडे,किरण इंगोले ,प्रीती करवते ,मनीषा टाले, साक्षी खोडके, शिवकन्या सरकटे,दुर्गा कोरडे, यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय साबळे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.जयश्री काळे मॅडम यांनी केले उपस्थित सर्व सर्वांचे विद्यार्थ्यांचे आभार किरण इंगोले या विद्यार्थिनी मानले.
Users Today : 22