अकोट ग्रामीण रुग्णालयातील कर्तव्यात कसूर करणाऱ्यानां तात्काळ निलंबित करा – उमेश इंगळे

Khozmaster
2 Min Read

 

 

(

सांय दै खोज मास्टर वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या बातमीवरून)

अकोला प्रती – अकोट ग्रामीण रुग्णालयातील कर्तव्यात कसूर करणाऱ्यानां तात्काळ निलंबित करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी आपले सरकार पोर्टल द्वारे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे आरोग्य सेवा मिळवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे किंबहुना ति मिळालीच पाहिजे परंतु संबंधित यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे तसेच सुविधा असुन ही सेवा न मिळणे आणि त्यातुन मृत्यू होणे या पेक्षा मोठे दुर्दैव कोणते असु शकेल

अकोट ग्रामीण रुग्णालयात 108 रूग्णवाहीका हजर असुन रुग्णांना मिळत नसल्याचे वास्तव आहे अकोट ग्रामीण रुग्णालयात22 मे रोजी 108 च्या दोन रुग्णवाहिका एम.एच 14 सि एल 1235 आणि एम एच 14 सि एल 0813 या उपलब्ध असुनही तेल्हारा येथिल रुग्णवाहिका येणार असल्याचे सांगून जवळपास साडे तीन तास रुग्णांला तात्काळत राहावे लागले रुग्णाची परिस्थिती गंभीर असतांना सुद्धा अकोट ग्रामीण रुग्णालयाच्या पाठिमागे झाडाझुडुपांमध्ये 108 रुग्णवाहिका लपऊन ठेवल्याची गंभीर घटना 22 हे रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली त्यामुळे वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला उमरा येथिल गंभीर रुग्णांला रेफेर करण्यासाठी जवळपास साडे तीन तास रुग्णांला रुग्णवाहिकेची वाट पहावी लागण्याने रुग्णांला जिव गमवावा लागला या प्रकरणी चौकशी करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या वर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल यांची नोंद घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी आपले सरकार पोर्टल द्वारे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

 

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *