आलेगाव चाकू हल्ल्यातील जखमी युवकाचा मृत्यू गुन्ह्यात होणार वाढ

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रक्षण देशमुख

आलेगाव :- आलेगाव येथे छ शिवाजी चौकात दोन सख्ख्या भावांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना दि. २९ मार्च रोजी घडली होती. या हल्ल्यात चेतन श्यामराव काळदाते व दीपक श्यामराव काळदाते हे दोघे भाऊ गंभीर झाल्याने त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान चेतन श्यामराव काळदाते याचा मृत्यू झाल्याची घटना दि. ३ एप्रिल रोजी उघडकीस आली.

चान्नी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आलेगाव येथील आरोपी महादेव प्रल्हाद धात्रक, गणेश प्रल्हाद धात्रक, दीपक प्रल्हाद धात्रक यांच्यावर मारहाणीचा गुन्हा

दाखल केला होता. गंभीर जखमी दोघा भावांवर उपचार सुरू होते. दि. ३ एप्रिल रोजी चेतन काळदाते या युवकाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चान्नी पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

दरम्यान प्रकरण गंभीर असतानाही आरोपीविरुद्ध गुन्ह्यात वाढ केली नसल्याने आमच्यावर अन्याय झाल्याचा आरोप मृताची आई विजयाताई काळदाते यांनी केला असून, मृतकाच्या नातेवाइकांनी ३ एप्रिल रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे.

0 9 4 6 8 9
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *