श्री हनुमान जन्मोत्सव दिनी शेकडो पक्षांसाठी बनविले घरटी

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

पातूर :- नुकत्याच संपन्न झालेल्या संत श्री सिदाजी महाराज यात्रेत भाविकांनी मातीच्या मडक्यात दहीहंडी प्रसादाचे वाटप केले होते.प्रसाद वाटप झाल्यानंतर हे मातीचे रिकामे मडके न फोडता व न फेकून देता पातूर तालुका विकास मंचाच्या कार्यकर्त्यांनी ते गोळा करण्याची मोहीम राबवली. गोळा झालेल्या शेकडो मातीच्या मडक्यांचा शहराच्या आजूबाजूच्या परिसरात वावरणाऱ्या पंक्षांना त्यांच्या राहण्यासाठी घरटी म्हणून उपयोग व्हावा हा एकमात्र उद्देश आहे.उन्हाळ्याच्या दिवसात शेतकरी आपल्या शेतातील बांधावर उगवलेले झाडे झुडपे गवत काडीकचरा आग लावून पेटवून देतात त्यावेळेस त्या झाडा झुडपात वास्तव्यास असलेले पक्षी,त्यांची अंडी लहान पिल्ले त्या घरट्यांसह जळून खाक होतात आणी ते बेघर होतात परिणामी पक्षांची उत्पत्तीत घट होते हे टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतात याप्रकारे घरटी बनविल्यास त्या पक्षांना हक्काचे घर मिळेल अशी धारकरी विजय राऊत यांची भावना असून याप्रकारे आव्हान त्यांनी केले आहे.पक्षांना राहण्यासाठी थंड,हवेशीर जागा मिळावी तसेच डिजिटल युगात चिमणी,मैना,बुलबुल,लाई,पोपट, सुतार पक्षी,कोकीळा सारख्या अनेक पक्षांच्या वेगवेगळ्या जाती नामशेष होत आहेत अशा पक्षांचे जतन करणे हे खुप मोठे आव्हान असल्याने पातूर तालुका विकास मंचाचे कार्यकर्ते तसेच समाजातील इतर समाजसेवी संस्था ही प्रयत्न करतांना दिसत आहे. धारकरी विजय राऊत यांनी यात्रेतील टाकावू वस्तू पासून बनवलेल्या या घरट्यांचं निसर्ग प्रेमिंकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

  या उपक्रमाला पातूर तालुका विकास मंचाचे संयोजक शिवकुमार बैस,विजय गोरे,राणे गुरूजी,सागर सुहास देवकर,लक्ष्मण बारतासे,पै.पुष्कराज कढोणे,जीवन राऊत,नवीन गाडगे,श्रीमती रत्नाबाई राऊत,विठ्ठल डिके,सतिश वानखडे,गोलू खंडारे,विनोद तेजवाल,पत्रकार किरण निमकंडे,वैष्णवी राऊत,प्राजक्ता राऊत,चैतन्य राऊत,कार्तिक डिके, डॉ विलास हिरळकार,मधुकर राखोंडे,जय देवकर,शुभम इंगळे तसेच इतरांचे सहकार्य मिळाले.

0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *