प्रतिनिधी रामेश्वर वाढी
पातुर तालुक्यातील आलेगाव कोलदरी येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध झालेल्या जय तपे हनुमान संस्थान येथे मोठ्या उत्साहात आज 6 एप्रिल 2023 रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे

यानिमित्त जय तपे हनुमान संस्थांनच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आलेगाव येथील गो सेवा प्रकल्पाचे अध्यक्ष सुभाष दादा जैन होते तर पुणे येथील युवा उद्योजक शिवकुमार सिंह ठाकुर बायस, संगीत तज्ञ प्राध्यापक विलास राऊत, पातुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष देवानंद गहिले, सुप्रसिद्ध गायक कलावंत प्राध्यापिका

सौ करुणा गवई, पातुर पोलीस स्टेशनच्या दक्षता समितीच्या श्रीमती भारतीताई गाडगे, महिला बचत गटाच्या श्रीमती मायाताई शिरसाठ, श्रीमती साधना इंगळे, मानवी हक्क अभियान संघटनेच्या महिला जिल्हाप्रमुख सौ ज्योतीताई दाभाडे, जय तपे हनुमान संस्थानचे विश्वस्त तुकाराम जी शिंदे, तपे हनुमान संस्थांनचे अध्यक्ष गणेशराव श्रीनाथ श्रीमती मंजुराबाई श्रीनाथ आदींची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती
सर्वप्रथम हनुमान जन्मोत्सवानिमित्त धार्मिक रितीरिवाजानुसार हनुमान जी ची पूजा सार्वजनिक रित्या करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले
यावेळी आलेगाव येथील सुभाष दादा जैन यांनी गरजू महिलांना आणलेल्या साड्यांचे वितरण उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले
याप्रसंगी शिवकुमार ठाकूर बायस, प्राध्यापक विलास राऊत, भारतीताई गाडगे यांनी हनुमान जी च्या शौर्याची माहिती मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना दिली
तर सुप्रसिद्ध गायिका प्राध्यापक सौ करूणा गवई यांनी विदर्भाचे आराध्य दैवत संत श्री गजानन महाराज आणि प्रभू श्रीरामचंद्रावरील “रामा रघुनंदना” अशा दोन गीतांचे गायन आपल्या सुमधुर आवाजात करून भाविकांना मोहित करून मंत्रमुग्ध केले
याप्रसंगी अविरत सेवा देणारे संस्थांनचे अध्यक्ष गणेश राव श्रीनाथ आणि त्यांच्या आई श्रीमती मंजुराबाई श्रीनाथ यांचा पातुर येथील महिला मंडळाच्या वतीने साडी, शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद गहिले आणि आभार प्रदर्शन रक्षण देशमुख यांनी यावेळी केले
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुकाराम जी शिंदे, पंढरी शेवलकार, विनायक ठाकरे, मुकुंद विटकरे, नवनाथ पवार, राजेश दाभाडे, संतोष मारोडकर, अभिषेक मेसरे, बंडू श्रीनाथ, आशाताई श्रीनाथ, सुनिताताई इंगळे, राधाबाई श्रीनाथ, सुशीला मेसरे, ऋषिकेश गिरे, गोपाल धंदरे, रमेश येनकर, रामदास श्रीनाथ, रमेश धाईत, नवनाथ पवार, एकनाथ पवार, दिलीप तायडे, दिलीप राक्षे, गजानन राजनकर, त्र्यंबक मेसरे, रमेश मेसरे, महादेव इंगळे, दिनेश काळपांडे, विनायक ठाकरे, अभिषेक मेसरे, अक्षय कापकर, संजय इंगळे, बंडु जाधव, शंकर लहांमगे, मयूर मेटांगे, विष्णू राठोड, मूलचंद राठोड यांच्यासह जय तपे हनुमान संस्थान आलेगाव कोलदरी चे सर्व विश्वस्त संचालक मंडळ भाविक भक्त यांनी अथक प्रयत्न केले आहेत

Users Today : 37