पातुर येथे डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात रंगले कवी संमेलन

Khozmaster
3 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

पातुर येथील डॉक्टर एच एन सिन्हा महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे भव्य सभागृहामध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा 8 एप्रिल 2023 रोजी संपन्न झाला आहे

या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी तथा विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष नारायणराव जी अंधारे होते तर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष शंकर रावजी नाभरे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य विजयसिंहजी गहिलोत,विद्यार्थी संघाचे सचिव प्रकाशजी अंधारे डॉक्टर एच एन सिन्हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण खंडारे,पत्रकार संघाचे अध्यक्ष माजी विद्यार्थी देवानंद गहिले, कृष्णा रावजी घाडगे, प्रा. विठोबा गवई विशाल राखोंडे, प्रा भास्कर काळे आदींची मंचावर उपस्थिती होती

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर किरण कुमार खंडारे यांनी केले यावेळी त्यांनी महाविद्यालयाचे विकासात माजी विद्यार्थी यांची भूमिका महत्त्वाची आहे त्यामुळे महाविद्यालयाच्या विकासाकरता माजी विद्यार्थ्यांनी पुढे यावे असे आवाहन आपल्या प्रास्ताविक भाषणातून डॉक्टर किरण खंडारे यांनी केले तर शंकरराव नागरे यांनी आपले विचार व्यक्त करताना विदेशापेक्षा भारतीय शिक्षण प्रणाली खूप चांगली आहे भारतामध्येच घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःची आणि देशाची येथे प्रगती करावी असे आवाहन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष शंकरराव नागरे यांनी केले तसेच तुळसाबाई कावल विद्यालयाचे माजी प्राचार्य विद्यार्थी महासंघाचे कार्याध्यक्ष विजय सिंह गहिलोत, यांनी मार्गदर्शन करताना सिन्हा महाविद्यालयाचे कार्य कुणात्मक दृष्ट्या अतिशय प्रभावी आहे याकरता प्राचार्य डॉक्टर किरण कुमार खंडारे हे कठोर मेहनत घेत आहेत त्यांचे विकासात कामात मी तर मदत करेलच शिवाय इतर माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा या कार्यामध्ये सहभाग द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले यासोबत विद्यार्थी संघाचे सचिव प्रकाश अंधारे यांनी डॉक्टर एजन्सींना महाविद्यालयाचे प्रगतीचे विश्लेषण केले आणि मी महाविद्यालयाच्या विकासाला कटिबद्ध आहे इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवावा असे त्यांनी आवाहन केले या कार्यक्रमात माजी विद्यार्थी देवानंद गहिले, कृष्णराव घाडगे, प्रा. विठोबा गवई,अब्दुल जमील प्रा. मुकुंद कवळकर आदींनी सकस कविता आणि गीतांचे गायन केल्याने या कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली होती याप्रसंगी राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त करणारे विशाल राखोंडे आणि साहित्य पुरस्कार प्राप्त करणारे नारायणरावजी अंधारे या दोघा माजी विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयाचे वतीने प्राचार्य डॉक्टर किरण खंडारे यांनी केला आहे

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपाली घोगरे आणि आभार प्रदर्शन प्रा. अतुल विखे यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता माजी विद्यार्थी संघ समन्वयक डॉक्टर दिपाली घोगरे, अतुल विखे , माजी विद्यार्थी संघ डॉ. संजय खांडेल समन्वयक डॉक्टर चंदन राठोड विभाग प्रमुख इंग्लिश प्रा. उज्वला मनवर प्रा. महादेव टापरे ,प्रा. श्रुती देशमुख, प्रा. कुणाल विंचुरकर प्राध्यापक मोहन घुगे आदींनी परिश्रम घेतले आहे

0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *