शासनाचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार..नियम न पाळता स्थापन झाल्या समित्या..
विक्रम पाटील, विशेष प्रतिनिधी रिसोड/शांततेकडून समृद्धीकडे जाण्याची वाट हेच उद्दिष्ट गाव तंटामुक्त होण्यासाठी शासनाने ठेवले आहे. तंटामुक्त समिती कशी असावी, समितीचा अध्यक्ष कोण व कसा असावा, समितीमध्ये कोणाकोणाला समजावून घ्यावे, त्याचे सर्व निकष शासनाकडून निश्चित करण्यात आले. त्यानुसार काही गावातच फक्त हे निकष पाळल्या गेले, मात्र बऱ्याच गावात या निकषाच्या विरोधात केवळ मर्जीतले व कायद्याचे ज्ञान नसलेले लोक एकत्रित येऊन समित्या स्थापन केल्या. अनेक गावात सत्ताधारी पॅनलच्या कार्यकर्त्याचा या समितीत भरणा केला आहे. अशा स्थितीत तंटामुक्ती समितीकडून तंटे कसे सुटणार, हा असा प्रश्न नागरिक करीत आहेत.राज्य शासनाने 15 ऑगस्ट२००७ पासून अत्यंत गाजावाजा करून महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू केले. या योजनेला भावनिक दृष्ट्या महत्व यावे म्हणून संपूर्ण विश्वाला संदेश देणारे महात्मा गांधी यांचे नाव देण्यात आले. गावागावात शांतता नांदावी, बंधुभाव निर्माण व्हावा ,जातीय सामाजिक तेढ कमी व्हावी व गावचा सर्वांगीण विकास साधला जावा. या हेतूने राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू केले. गावागावात तंटामुक्त समिती स्थापन करण्यात आल्या. योजना सुरू होऊन गावात तंटामुक्त समित्या स्थापन झाल्या. तरी पश्चात मात्र काही गावात अवैध धंदे सुरू असल्याची वस्तू स्थिती असल्याने गावे तंटामुक्त कशी होणार ? असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत..
Users Today : 22