प्रतिनिधी रामेश्वर वाढी
अकोला : – स्थानिक वार्ड क्रं १८ मधील कमला नगर खुप मोठ्या प्रमाणात डांस वाढले होते लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊन टायफाईड, मलेरिया, डेंग्यू सारख्या रोगाची लागण होऊन नाहक त्रास सहन करावा लागत होता.म्हणुन सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त यांना आपले सरकार पोर्टल तसेच इमेल द्वारा डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली होती सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीची महानगरपालिका प्रशासन आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत कमला नगर येथे फरावणी केली असून उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीला यश आले असून नागरिकांनी उमेश सुरेशराव इंगळे यांचे आभार मानले
Users Today : 37