डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मद्य विक्री बंद ठेवा भिमजयंती सार्वजनिक उत्सव समितीची मागणी

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

पातूर :- येत्या दि. 14/04/2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून देशपातळीवर सांस्कृतिक कार्यक्रम,शोभायात्रा,मिरवणूक वगैरे काढून मोठ्या उत्साहात साजरी होत असते.त्याचप्रमाणे आपल्या अकोला जिल्ह्यात देखील महापुरुषांचा जयंती उत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा केल्या जातो,मात्र समाजातील काही असामाजिक तत्वांकडून दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे देखील प्रयत्न होऊ शकते व त्यामुळे कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

         त्यामुळे दि. 14/04/2023 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोला जिल्ह्यातील देशी दारू दुकान,बार,वाईन शॉप,बियर शॉप बंद ठेवण्यात यावे तसेच अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचेवर देखील अंकुश ठेवण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनास कराव्या या आशयाचे निवेदन भिमजयंती सार्वजनिक उत्सव समिती, पातूर यांच्यावतीने अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम यांना पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांच्या मार्फत देण्यात आले.

      यावेळी भिमजयंती सार्वजनिक उत्सव समितीचे निर्भय पोहरे,प्रविण पोहरे,स्वप्निल सुरवाडे,विकास सदार,आशिष दाभाडे,प्रशांत दाभाडे,धिरज खंडारे, निहार घुगे,धम्मपाल बोरकर,कुणाल किरतकार,काशीराम सरकटे, प्रमोद,देवकते,राजेंद्र पोहरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *