अल्पसंख्यांक वर्गाला प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लक्षांक मंजूर करा – इमरान खान मुमताज खान

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी 

 पातूर :- अल्पसंख्यांक वर्गाला प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लक्षांक मंजूर करणेबाबत पातुर पंचायत समितीचे उपसभापती इमरान खान मुमताज खान यांनी मा. प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे दिनांक 10 एप्रिल 2023 ला निवेदन देऊन तशी मागणी केली आहे 

 पातुर तालुका जि.अकोला येथील अल्पसंख्यांक मायनॉरिटी प्रपत्र ड यादीतील पात्र लाभार्थी यादी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाकडे ग्रामपंचायत निहाय ग्रामपंचायत ने मंजूर करून सादर केलेले आहेत परंतु अद्याप पर्यंत पातुर तालुक्यातील एकही ग्रामपंचायत मध्ये अल्पसंख्यांक मायनॉरिटी करिता प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे लक्षांक प्राप्त झाले नाही सदर बाब लक्षात घेता अल्पसंख्यांक या समुदायावर अन्याय होत आहे तरी अल्पसंख्यांक वर्गाकरिता तात्काळ घरकुल लक्षांक मंजूर करून पात्र लाभार्थीना लाभ देण्यात यावे अशी मागणी इमरान खान मुमताज खान पातुर पंचायत समिती उपसभापती यांनी केली आहे.

तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत अल्पसंख्यांक प्रपत्र यादीतील पात्र लाभार्थी यांची यादी ग्रामपंचायत ने मंजूर करून सादर केल्या आहेत अद्याप पर्यंत पातुर तालुक्यातील एकही ग्रामपंचायत मध्ये अल्पसंख्यांक करिता प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे लक्षांक प्राप्त झाले नाही हा अल्पसंख्यांक वर्गावर अन्याय असल्याने मी मा.प्रकल्प संचालक जि. ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.

0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *