डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Khozmaster
1 Min Read

कार्यालय प्रतिनिधी 

मुंबई :- मुंबईकर बाॅईज सामाजिक संस्था भोईवाडा चौक दादर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती खुप उत्साहात साजरी करण्यात आली.

  दादर पश्चिम च्या शिवडी नाका, अण्णाभाऊ साठे नगर,नायगाव पोलीस वसाहत, भोईवाडा चौक,किडवाई पोलीस चौकी या मार्गाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेली बैलगाडीचा सजवलेला रथ डिजेच्या तालावर नाचत नाचत मिरवणूक काढण्यात आली.

   पातूर तालुका विकास मंचाचे संयोजक शिवकुमार बैस व राजपूत संघटना मुंबईचे राणा अशोक इंगळे तसेच आमदार कालिदास कोळंबकर यांचे सहकारी याकोब वडागळे यांच्या वतीने मिरवणुकीतील सहभागी अनुयायांना अल्पोपहार उपलब्ध करून देण्यात आले.

  भोईवाडा चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी आमदार कालिदास कोळंबकर,,दिलीप खुडे,मलीक गंजी,मोहन कांबळे,दिपक बनसोडे,आकाश ढगे,सुदर्शन गुप्ता,संजय कांबळे सह मुंबईकर बाॅईज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

0 9 3 7 3 6
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *