*त्रिमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी*

Khozmaster
1 Min Read

*अकोट प्रतिनिधी*

 

महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती त्रिमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने मोठया जल्लोषात साजरी करण्यात आली. भीमजल्लोष कार्यक्रमात त्रिमूर्ती प्रतिष्ठान च्या वतीने भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेत

सर्वधर्म समभावाचे चित्र पहायला मिळाले.कार्यक्रमाचे वेळी मुंडगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच तुषार पाचकोर यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मा.सरपंच श्रावण भरक्षे,उपसरपंच तुषार पाचकोर, अनिल निमकर्डे, गाढे गुरुजी, तंटामुक्ती अध्यक्ष भगवान गावंडे,पं. स.सदस्य ज्ञानेश्वर दहिभात, दीपक मुंडोकार, अनिल गाढे,सावतराम सरकटे,यांच्यासह त्रिमूर्ती प्रतिष्ठान चे अध्यक्ष शेषराव सरकटे, उपाध्यक्ष मनिष सरकटे, सचिव सचिन सरकटे, कोषाध्यक्ष रंजित सरकटे यांच्यासह दिलीप भरक्षे, बोधाणंद आराख, राजेश पळसपगार, विकास सरकटे, बबन सरकटे, संदीप सरकटे, पत्रकार स्वप्नील सरकटे, राजेंद्र नाथे, गुणवंत लहाने,हिरा सरकटे, नागोराव सरकटे,इत्यादी उपस्थित होते.

यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे संचलन वानखडे गुरुजी यांनी तर आभार प्रदर्शन मनिष सरकटे यांनी केले.तसेच अकोट ग्रामीण पोलीस प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

0 9 4 6 8 3
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *