
*अकोट बस स्टँड समोर सात नंबर शाळेच्या बाजूला असलेल्या लक्कड मार्केटला आग*
प्रतिनिधी विशाल गवई अकोट
:- अकोट लक्कड मार्केटला आग लागून बरेच नुकसान झाले व आग वीजण्यासाठी अग्निशामकाणे आग नियंत्रणात आणली.त्या आगीत बरेच नूस्कान झाल्याची घटना अकोट मध्ये आज सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडली .लागलेल्या आगीला विझवण्यासाठी नगरपालिका अग्निशामक दल यांनी पुरेपूर आगीवर नियंत्रण केल्यामुळे दोन ते तीन दुकानाची सुरक्षा झाली

अकोट शहर पोलीस स्टेशन पथक आणि नगरपालिका कर्मचारी व नगरपालिका शिओ घटनास्थळी हजर झाले आग विझवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले..अकोट शहरातील मध्यभागी असलेल्या अकोट नगर परिषदेच्या शाळा क्रमांक ७ लगत नगर परिषदेच्या अतिक्रमन जागेतील लकडगंजला आग लागली.यामध्ये ६ ते ७ दुकाने जळुन खाक झाल्याची माहिती आहे.यामध्ये नगर परिषद शाळा क्रमांक ७ मधील साहित्यही जळाल्याची माहिती आहे परिसरातील दवाखाने,बँक,सुदैवाने बचावले घटनास्थळी अकोट शहर ठाणेदार प्रकाश अहिरे, psi राजेश जवरे सह अकोट शहर पोलिसांची घटनास्थळी धाव घेतली.अकोट अग्नीशमन दलासह तेल्हारा, मुर्तिजापूर अकोला येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण नागरिकांचे हि सहकार्य सर्व प्रशासकीय विभागाच्या सहकार्यातून आग आटोक्यात आली.
Users Today : 75