
*हरवलेली पोत वापस दिल्याबद्दल नंदा सांगोळे यांचा साळी चोळी देऊन सत्कार*
प्रतिनिधी विशाल गवई अकोट
अकोट पाचपोर प्लॉटमधील रहिवासी नंदा सांगोळे या महिलेला ५२ मनी व एक पेंडॉल सोन्याची पोत सापडली असतं त्या महिला ने पत्रकाराला सापडलेले पोतीची हकीकत सांगितली पत्रकाराने अकोट शहर चे ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्यासोबत संपर्क साधला ठाणेदार साहेबांना बिट जमादार मेजर हिम्मत दंदी याना त्या महिला कडे पाठवले त्या महिलांनी सापडलेली पोतची हकीकत सांगितली व पोत परत करण्यासंदर्भात सांगितले बीट जमादार मेजर हिम्मत दंदी यांनी हरवलेली सोन्याची पोत लक्ष्मी गावंडे या महिलेची होती या महिल्याला नंदा सांगोळे या महिलांच्या निवासस्थानी बलवून सोन्याची पोत परत करण्यात आली पण त्याचा कुठेतरी मोबदला किंवा आदर व्हावा या उद्देशाने महिला मुक्ती मोर्चा आकोट तालुका अध्यक्ष लक्ष्मी गावंडे यांनी वेताळ बाबा संस्थान येथे सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करून

त्या महिलेचा साडीचोळी देवुन सत्कार केला व जमादार हिम्मत दंदी मेजर यांचा सुध्दा सत्कार व स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला उपस्थित अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे व बीट जमादार हिम्मत दंदी मेजर यांनी नंदा सांगोळे या महिलाचा हरवलेली पोत वापस केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले यावेळी महिला मुक्ती मोर्चा संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी नंदा सांगोळे व हिम्मत ददी मेजर यांचा सत्कार केला महिला मुक्ती मोर्चा संघटनेचे अकोला जिल्हा संपर्कप्रमुख गणेश वाकोडे यांच्या उपस्थिती मध्ये सत्काराचा कार्यक्रम पार पडला तसेच कार्यक्रमाचे आयोजन अकोट तालुका अध्यक्ष लक्ष्मी गावंडे,उपाध्यक्ष सरिता ठाकूर,कार्याध्यक्ष सीमा निंबोकार,उपाध्यक्ष पुष्पा तीहिले, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर गोरडे, तुळशीराम गुंजकर, महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार संघटनेचे अमरावती विभागीय उपाध्यक्ष अहेमद शेख पञकार, वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अकोला जिल्हा अध्यक्ष पी एल आमले,अनिल राऊत, गणेश पतंगे, मंगेश पतंगे, संध्या राऊत, रूपा सरकटे, वृषाली पतंगे, पत्रकार स्वप्निल सरकटे, पत्रकार पवन बेलसरे, पत्रकार गणेश वाकोडे, आधीची उपस्थिती लाभली होती
या कार्यक्रमाचे परिश्रम
दीपक मोरे, सुरेंद्र मोरे,गोदावरी, संतोषी, संध्या राऊत, पंकज गहले, यांनी तर संचालन नंदकिशोर कोरडे तर आभार गणेश पंचांग यांनी मानले
Users Today : 75