
*संत नगरी मुंडगावला बाल संस्कार शिबीराचा शुभारंभ*
प्रतिनिधी विशाल गवई अकोट
श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव द्वारा आयोजित श्री झामसिंग महाराज बाल संस्कार निवासी शिबीराचा शुभारंभ झाला.
विस दिवसीय या शिबीराचा शुभारंभ सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. रामकुमार जयस्वाल जिल्हा प्रचारक गुरुकुंज आश्रम मोझरी हे होते तर उद्घाटक म्हणून ह. भ. प. श्री वासुदेव महाराज खोले गुरुजी वरुळ जऊळका हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व शिबीराचे मार्गदर्शक ह. भ. प. श्री गजानन महाराज हिरुळकर, व किड्स प्लानेट स्कूल अकोट चे संचालक मनिषजी अढाऊ सर, विश्वासराव म्हैसने लोहारी, हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिप व श्री गजानन महाराज श्री झामसिंग महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. आलेल्या पाहुण्यांचे पादुका संस्थान विश्वस्त मंडळाकडून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ रामकुमार जयस्वाल यांनी पादुका संस्थान चे अध्यक्ष विलास बहादुरे व शिबीराचे प्रशिक्षक ह. भ प श्री सुदर्शन महाराज खडसने यांना ग्रामगीता देवुन सन्मानीत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थानचे कोषाध्यक्ष विजय ढोरे यांनी केले. यावेळी ह. भ. प. श्री खोले महाराज, मनिषजी अढाऊ सर, श्री गजानन महाराज हिरुळकर, डॉ जयस्वाल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शिबीर व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. सुभाष रोठे यांनी केले.
विस दिवसीय शिबीराची सांगता दि. १० मे रोजी होणार आहे. या शिबीराला ह. भ. प. श्री संजय महाराज पाचकोर, ह. भ प श्री. प्रशांत महाराज ताकोते, ह. भ प श्री. गजानन महाराज हिरुळकर तर प्रशिक्षक म्हणून ह भ. प श्री गजानन महाराज खेट्टे, शेगाव, ह भ प श्री. सुदर्शन महाराज खडसने, मुंडगाव, ह. भ प श्री. करण महाराज व्यवहारे आळंदी हे आहेत. शिबीरात सहभागी होण्यासाठी १४० विद्यार्थींची नोंदणी पालकांनी केली आहे.यात मुंडगाव सह पंचक्रोशीतील विद्यार्थी शिबीरात निवासी आहेत. श्रींच्या भक्तांच्या मदत देणगीतून शिबिरातील विद्यार्थ्यांना नाश्ता, भोजन व इतर सोई सुविधा पुरवल्या जात आहे.
बाल संस्कार शिबीर उद्घाटन कार्यक्रमाला श्री गजानन महाराज पादुका संस्थान चे अध्यक्ष विलास बहादुरे, उपाध्यक्ष गणेश ढोले, सचिव शरद सोनटक्के, व्यवस्थापक महेश गाढे, विश्वस्त ज्वारसिंग आसोले, कोषाध्यक्ष विजय ढोरे उपस्थित होते तर शिबीर व्यवस्थापन समिती चे सदस्य नरेश ठाकरे गुरुजी, दिनकरराव बहाकर, सुनिल सदार, डॉ. सुभाष रोठे, विश्वासराव म्हैसने, दिपक सापधारे, छगनभाऊ अंबळकार, अशोकराव देवगीरे तसेच शाम थारकर व पालक उपस्थित होते.
Users Today : 33