
*मुंडगाव येथे मोठ्या उत्साहात ईद साजरी*
- *अकोट प्रतिनिधी विशाल गवई
अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी ईदुल फित्र साजरी करण्यात आली.मागील दोन वर्षापासून कोविड मुळे ईद घरीच साजरी केली जात होती.परंतु यावर्षी कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे ईद सर्व मिळुन ईदगाह वर जाऊन ईद साजरी करण्यात आली.यावेळी मौलाना शेख अफसर साहब यांनी ईदच्या नमाजचे पठण केले,व नमाजच्या शेवटी देशात अमन व शांती या साठी दुवा केली.त्यानंतर सर्वानी एक दुसर्याला गळभेट घेऊन शुभेच्छां दिल्या.यावेळी अध्यक्ष शेख कयूम अजीद अहेमद,सामाजिक कार्यकर्ते इम्रान खान ,समिर पठाण, अब्दुल आबिद, हाफिज अबरार,अमीन सौदागर, फारूख बागवान, अब्दुललाह पठाण, शेख साबिर कुरेशी ,शेख इनाम मौलाना,उजेर साहब ,उपसरपंच तुषार पाचकोर, पं.स.सदस्य ज्ञानेश्वर दहीभात, दीपक मुडोकार, जुगल चिंचोलकार यांच्यासह आदी समाज बांधव उपस्थित होते.यावेळी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Users Today : 33