
- *45 वर्षीय इसमाने केली गळफास घेऊन आत्महत्या*
प्रतिनिधी विशाल गवई अकोट
अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील शेत शिवारात एका 45 वर्षे इसमाने आत्महत्या केल्याची घटना पाच ते सहा दिवसापूर्वी घडली सदर प्रकार शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आला.
मुंडगाव येथील दिनेश रामदास गवई या 45 वर्षीय इसमाने मुंडगाव शेतशिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची,घटना शनिवारी उघडकीस आली. याबाबतचे माहिती अकोट पोलिस स्टेशनला मिळतात घटनास्थळावर पोलीस पोहोचून त्यांनी पंचनामा केला. तब्बल पाच ते सहा दिवसांपूर्वी केलेल्या आत्महत्या मुळे प्रेतास प्रचंड दुर्गंध सुटला होता.त्यामुळे सदर इसमाचा पंचनामा जाग्यावरच करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली,काही दिवसांपूर्वी दिनेश हरवल्याची तक्रार अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली होती.दरम्यान या इसमाने आत्महत्या कोणत्या कारणावरून केली, ही बाब अद्यापही स्पष्ट झाली नाही. पोलिसांनी मार्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनास्थळावर ठाणेदार नितीन देशमुख पीएसआय विजय पंचबुद्धे बीड जमादार भास्कर सांगळे, राहुल कांबळे, श्याम ताडे ,वैद्यकीय अधिकारी शारदा भिरडे,वैद्यकीय अधिकारी विजय वेरूळकर,राजेंद्र वानखडे तलाठी,तंटामुक्तीचे अध्यक्ष भगवान गावंडे ,पं.स.सदस्य ज्ञानेश्वर दहीभात, पोलीस पाटील बाळकृष्ण भगेवार मिलिंद सरकटे,गितेश कुंजाम,ग्रा.पं.सदस्य सुरेश गवई, भास्कर पोहरकार, विनोद सपकाळ,पत्रकार स्वप्निल सरकटे विशाल गवई यांनी हजेरी लावली होती.
Users Today : 15