
*संतोष गवई समतापर्व दूत पुरस्काराने सन्मानित*
प्रतिनिधी विशाल गवई अकोट
अकोला जिल्हा ग्रंथालय संघ च्या वतीने मूर्तिजापूर येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त समता पर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
शैक्षणिक व सार्वजनिक जीवनात सामाजिक समता निर्माण करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल आज ज्येष्ठ समाजसेवी शरदभाऊ वानखडे, शामभाऊ वाहूरवाघ, गजाननभाऊ हरणे, ज्येष्ठ नाट्यकर्मी रमेशकाका थोरात, कवी विठ्ठल कुलट, समाधान इंगळे समाधान वानखडे यांच्या उपस्थितीत समतापर्व दूत हा पुरस्कार देऊन अकोला जिल्हा प्रतिनिधी संतोष हिरामण गवई यांना सन्मानित करण्यात आले. संतोष गवई हे परीवारची व स्वता जिवाची पर्वा न करता गोरगरीबांच्या सुखा दुःखात सहभागी होतात गरीबावर अन्याय झाला तर अन्यायला वाचा फोडतात व अन्याय्य झाले त्याना न्याय देण्याचा प्रयत्न करतात
Users Today : 75