रिसोड प्रतिनिधी :-* शेती आणि आहारात मुंगास अनन्यसाधारण महत्व आहे. कडधान्य पिकामध्ये अल्पावधीत तयार होणारे खरीप व उन्हाळी हंगामातील मुंग हे महत्वाचे पीक आहे. कृषी विज्ञान केंद्र
वाशिमच्या वतीने रिसोड तालुक्यातील मौजे पळसखेड येथे दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी उन्हाळी मुंग शेती दिन व शिवार फेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत सदस्य संतोष अंबादास खरात हे होते तर प्रमुख उपस्थीतीमध्ये कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.आर.एल.काळे, विस्तार तज्ञ डॉ.एस.के.देशमुख व किटकशास्त्रज्ञ आर.एस.डवरे उपस्थीत होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.एस.के.देशमुख यांनी माती परीक्षणाच्या विविध पदधती, शेतीतील खर्च कमी करावयाच्या उपाय योजना, हवामान संदेशासाठी नाव नोंदणी करावी तसेच घरगुती पदधतीने सेंद्रिय निविष्ठा उत्पादनावर भर दयावा व फळबाग लागवड वाढवावी असे आव्हान केले.डॉ.आर.एल.काळे यांनी कृषी विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध शेतकरी केंद्रित उपक्रम व सुविधा या बाबत मार्गदर्शन करतांना पिंकांची फेरपालट, सरी वरंबा पदधतीचे फायदे, उत्पन्न दुप्पट करुन उत्पादकता वाढवावी, उगवणशक्ती तपासणी, बिज प्रक्रिया, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क वापर वाढविणे तसेच नैसर्गिक शेती व एकात्मीक शेती पदधतीचा अवलंब करावा असे सुचविले.आर.एस.डवरे यांनी उन्हाळी मुंग उत्पादकता वाढीचे सुत्र, किड व रोग व्यवस्थापनाकरीता 5 टक्के निंबोळी अर्क दहा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी तसेच पिवळे चिकट सापळे एकरी 10 ते 12 शेतात लावावे, पेरणीपुर्वी बीज प्रक्रिया करणे, माती परीक्षणाच्या आधारे शिफारशीत खत मात्रा व सुक्ष्म अन्नद्रव्य देणे व बुरशिनाषकाचा वापर वाढवावा असे आव्हान केले.तांत्रिक सत्रानंतर महादेव रामकिसन घुगे यांच्या शेतातील मुंग पिक प्रात्यक्षिकाला भेट देवुन शेतक-यांच्या शंकाचे निरसन शास्त्रज्ञांकडुन करण्यात आले. कार्यक्रमास पळसखेड, बिबखेड, भागकरखेड, खडकी, देगाव व लिंगा येथिल शेतक-यांनी सहभाग नोंदविला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भगवान देशमुख तर आभार गंगाधर काळे यांनी मानले..
Users Today : 22