आलेगाव परिसरात गारपीट, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस एक ते दीड महिन्यात सहाव्यांदा गारपिट हातातोंडाशी आलेला घास गेला,सरकारने तातडीने पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत करावी

Khozmaster
2 Min Read

 

आलेगाव, प्रतिनिधी

 

येथील परिसरामध्ये शनिवारी सायंकाळी गारपीट वादळी वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा, मूंग,बिज्ज्वाई कांदा पिकासह टीनशेडचे अतोनात नुकसान झाले. तसेच सोसाट्याच्या वाऱ्याने रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतुक ठप्प झाली होती.

पातूर तालुक्यातील आलेगाव परिसरामध्ये अवकाळी गारपीट, वादळी वारा व मुसळधार पावसाने झोडपून काढले.परिसरात एक ते दीड महिन्यात सहाव्यांदा सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिट,पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा,मूंग, बिज्वाई कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

वादळामुळे विश्वास खुळे यांच्या शेतातील टीनशेड पडल्याने मोठे नुकसान झाले असून, बकऱ्या चारणाऱ्या मुरलीधर खराटे सदरच्या टीनशेडमध्ये उभे होते. मात्र दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. आलेगाव- डोणगाव रस्त्यावर झाड पडल्याने काही वेळाकरिता वाहतूक बंद झाली होती. वाहन चालकांनी रस्त्यावरील झाडांच्या फांद्या बाजूला करून रस्ता वाहतुकीस मोकळा केला. या वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे उन्मळून पडली.या आस्मानी सुलतानी संकटाने शेतकरी पुरता घायाळ झाला आहे.तरी शासनाने नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचे कार्य करण्याचे आवाहन जनता करत आहे.पिकावर एवढा खर्च करून हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून मायबाप सरकार कडून मदतीची अपेक्षा आहे.

—————————————-

गारपिट व सतत मुसळधार पावसाचा मी शेतकऱ्यांकडून आढावा घेतला प्रचंड नुकसान झालेले आहे.सरकारने तातडीने पावले उचलून शेतकरी बांधवांना मदत जाहीर करावी.

डॉ अभय पाटील

शेतकरी नेते

—————————————-

 

माझ्या शेतातील संपूर्ण कांदा पिकाचे नुकसान झाले आहे तसेच शेतातील तीनशेड वाऱ्यामुळे कोसळले. गुरे ढोरे सुदैवाने बचावले आता काय कराव काही सुचत नाही 

दिनेश खुळे

शेतकरी

0 9 4 6 8 3
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *