आलेगाव प्रतिनिधी
आलेगाव दी.2 मे प्रतिनिधी पातूर तालुक्यामध्ये सन 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे,शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप पावेतो आर्थिक मदत जमा झाली नाही.तसेच सन 2023 मध्ये अवकाळी गारपीट वादळ व मुसळधार पावसाने सहा वेळा झोडपून काढल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कांदा पिका सह फळपिकांचे अतोनात नुकसान केले.तरी संबंधित प्रशासनाने नुकसान पिकाचे तात्काळ सर्व्हेक्षण करून शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी या अनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पातूर तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा कृषिमंत्री यांना थेट निवेदनाद्वारे मागणी केली करण्यात आली आहे.
पातूर तालुक्यामध्ये निसर्गाने अवकृपा करित सन २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पकाचे अतोनात नुकसान झाले.त्या अनुषंगाने संबंधित प्रशासनाने नुकसान पिकाचे सर्व्हेक्षण केले.तसेच महसूल विभागाने शेतकऱ्याकडून बँक खात्याचे खाते नं सुधा घेतले होते.तरी अद्याप पावेतो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनाची मदत रक्कम जमा झाली नसताना पुन्हा वरून राजाने मार्च एप्रिल मध्ये अवकाळी गारपीट वादळ व मुसळधार पावसाने जोमदार हजरी लावत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांदा व फळपिकांना झोडपून काढले त्यामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले.
दरम्यान शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्यांना आर्थिक बळकटी मिळावी या अनुषंगाने शेतकरी जागर मंचचे नेते कृष्णा अंधारे यांच्या नेतृत्वामध्ये पातूर तहसीलचे नायब तहसिलदार विजय खेडकर यांचे कडे वरील मागण्यांचे निवेदन दी.2 मे रोजी सादर करून राज्याचे मुखमंत्री तथा कृषिमंत्री यांच्या कडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.निवेदनावर कृष्णा अंधारे श्रीधर लाड,रक्षण देशमुख,चेतन भुजबळ,रामराव बोदडे,बाळासाहेब तायडे,रामकुमार अमानकर,राजेश देशमुख,सुनील देशमुख,धनंजय देशमुख,गौरव देशमुख,सुनील इंगळे,निशांत टाले,भिमराव उपर्व्हट, गोपाल पोरे,गजानन देशमुख,प्रवीण बंड,श्रीकांत गाडेकर,संजय माळी,राजेश क्षीरसागर आदींसह शेकडो शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
Users Today : 33