
*वाढदिवसाच्या निमित्त गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तके वाटप*
प्रतिनिधी विशाल गवई अकोट
अकोट पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले व गरजू व्यक्तींना नेहमी मदत करणारे अकोट पोलीस स्टेशनचे अमलदार हिम्मत दंदी यांनी अकोट पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या उपस्थितीत गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तके वाटून वाढदिवसा निमित्त अनोखा उपक्रम राबवला . बहुतांश जण आपला वाढदिवस केक कापून किंवा पार्टी करून साजरा करीत असतात परंतु अकोट पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले हिम्मत दंदी यांनी आपला वाढदिवसा निमित्त गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तके वाटून एक नवा आदर्श प्रस्थापित केला. व सर्वांनीच आपला वाढदिवसा निमित्त महामानवाचे विचार रुपी पुस्तके किंवा स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटून व त्या विचारांचा प्रचार व प्रसार करून साजरा केल्यास येणारी भावी पिढी सुखकर व आनंददायी आयुष्य जगेल असे विचार मांडण्यात आले या प्रसंगी अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे. उपविभागीय अधिकारी रितू खोकर मॅडम पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे . पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे . पोलीस अंमलदार विलास मिसाळ. दीपक घुगे. जोहरीरलाल .जाधव. दिगंबर पवार. सुलतान पठाण .विठ्ठल चव्हाण. दिलीप तायडे. सोळंके. भास्कर दामोदर मनीष कुलट आरसीपी अमलदार. महिला अमलदार प्रतिभा सुरतने. अश्विनी प्रमिला इत्यादी अधिकारी व अमलदार व पत्रकार व विद्यार्थी उपस्थित होते
Users Today : 33