उमेश इंगळे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे आरोग्य प्रशासन विभागाला आली जाग..

Khozmaster
2 Min Read

अकोला प्रती – सर्व हॉस्पिटल धारकांना त्यांच्या कडे असलेल्या सेवा बाबत रुग्ण हक्काची सनद व दरपत्रके यांची माहिती दर्शनी भागात लावणे बंधनकारक असल्यानंतर ही बरेच हॉस्पिटलमध्ये असे पत्रक लावले नाहीत करीता आपण सदर हॉस्पिटल धारकांना रुग्ण हक्काची सनद व दरपत्रके यांची माहिती दर्शनी भागात लावणे बाबत सुचना द्याव्यात व आपण स्वतः सर्व खासगी हॉस्पिटल मध्ये भेट देऊन सदरील रुग्ण हक्काची सनद व दरपत्रके लावली असल्याची खात्री करून घ्यावी अन्यथा आम्ही महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना सर्व हॉस्पिटल ची तपासणी करून ही दर पत्रक लावले नसल्यास पुराव्यानिशी आंदोलन करू अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर यांच्या मार्गदर्शनात उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीची दखल घेत जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे रुग्ण हक्काची सनद जिल्हा स्त्री रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात आले आहे तसेच या रुग्णालय मार्फत रुग्णांना जननी शिशु सुरक्षा योजने अंतर्गत येणाऱ्या रुग्णांना निःशुल्क सेवा देण्यात येते.व ईतर बाबीचे शुल्काबाबत चा फलक दर्शनी भागात लावण्यात आलेला आहे असे पत्र उमेश सुरेशराव इंगळे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे आरोग्य विभागाला जाग आली असुन जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला मार्फत पत्र पाठऊन कळविले आहे म्हणून महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचा दणक्यामुळे हे फलक लावले असल्याचे रुग्णांनी सांगितले आहे

 

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *