रामचंद्र बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने पंचशील नगर येथे बुद्ध जयंती साजरी

Khozmaster
2 Min Read

वाशिम प्रतिनिधी ; रामचंद्र बहुउद्देशीय जनजागृती कला व संस्कृती संस्था सावंगा जहागीर च्या वतीने आज दिनांक ५ मे रोजी पंचशील नगर मध्ये बुद्ध जयंती साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लोककवी विलास भालेराव तसेच चित्रपट निर्माता आणि ज्येष्ठ साहित्यिक एन.पी. सरकटे आणि प्रसिद्ध व्याख्याते एडवोकेट पी.पी अंभोरे, नवनिर्वाचित पत्रकार सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पट्टेबहादूर ,उत्तम खडसे यांची उपस्थिती लाभली. प्रथमता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर बोधीवृक्ष आणि धम्म ध्वजाची पूजा करण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन भगवान बुद्धाच्या जीवनावर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पंचशील नगर मधील बौद्ध उपासक उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेच्या सचिव गायिका विश्रांती गायकवाड, उपाशीका संगीता गायकवाड, सुनिता खंडारे, सखुबाई खंडारे, चतुराबाई काशीदे ,कलावतीबाई कांबळे, नंदा गायकवाड ,पुष्पा गायकवाड, पूजा पाईकराव, पुष्पा पाईकराव अरुणाबाई तायडे, कल्पनाबाई कांबळे, वैशाली गायकवाड ,अर्चना गायकवाड, ज्योती सहस्त्रबुद्धे, काजल ढाले, उषा आगम, तातेराव नवघरे, भीमराव काशीदे ,रवी कांबळे ,भास्कर गायकवाड, सुमेध गायकवाड, प्रताप गायकवाड ,दिलीप गायकवाड, बबन गायकवाड, राजू गायकवाड ,निषाद गायकवाड, नैतिक गायकवाड, वीर गायकवाड, निव्यान गायकवाड ,जय ढाले, रोनक ढाले ,निलेश गायकवाड, नितेश गायकवाड, जनार्दन जाधव, बहुसंख्येने बौद्ध उपासक उपासिका तसेच बाल बालिका हजर होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन प्रसिद्ध गायक लोककवी कवीनंद गायकवाड संस्था अध्यक्ष यांनी केले शेवटी प्रसाद घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.

 

0 9 3 7 1 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *