प्रतिनिधी आलेगाव
वनदेव तालुका पातुर येथे दि 01/05/2023 ते 15/05/2023 या कालावधित प पु नारायण महाराज यांच्या सानिध्यात अध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आजच्या पिढीला प्रेरणादायी संस्कार क्षम विचारांची गरज आहे, नकारात्मकता मुलामध्ये येऊ नये असे विविध प्रकारचे विचार या ठिकाणी महंत श्री कृष्णानंदजी महाराज , ह भ प तुकाराम महाराज सखारामपुरकर, ह भ प स्वामी अक्षयानंद महाराज, रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर,रामायणाचार्य लक्ष्मणदासजी महाराज दुर्गबोरी, महंत जानकीवर महाराज लकड बाबा संस्थान यांचे विचारधन याठिकाणी बालकांना देण्यात येनार आहेत. तसेच याठिकाणी गायनाचार्य, मृदंगाचार्य शिक्षक मंडळी सोबत असणार आहे करीता या बाल सुसंस्कार शिबिराचा वय वर्ष 10 ते 16 वयोगटातील मुलांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक श्री नारायणदासजी महाराज यांनी केले आहे.

Users Today : 30