महावितरणच्या कार्यालयावर धडक : शिवसैनिकांनी दिला इशारा..* *आठ दिवसात सुधारणा न झाल्यास आंदोलन..

Khozmaster
2 Min Read

रिसोड प्रतिनिधी, वाशिम*

वाशिम जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.सुधीर कवर यांचे अध्यक्षतेखाली ८ मे रोजी दु. १ वा. वाशिम जिल्ह्याच्या महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता वैद्य साहेब यांची भेट घेऊन वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्याच्या ए जी पंपाच्या विजजोडणी बाबत विलंब होत असल्याबाबत जाब विचारला याबाबत शेतकऱ्याचे पैसे भरून सुद्धा वेळेत विज जोडणी होत नाही व कमी दिवस असल्याने जोडणी होणे शक्यही नाही. अशा संबंधित ठेकेदाराला काम न देता काम करणाऱ्या ठेकेदारास काम द्यावे व कार्यरत असलेल्या ठेकेदारास कमी करून कामे सुरळीत व लवकर होतील, विलंबही होणार नाही त्यामुळे येणाऱ्या हंगामात त्याच्या शेतीला पाणी मिळेल अशा पद्धतीचा काम करणारा ठेकेदार असावा व रब्बी हंगामात कोणत्याही शेतकऱ्याला जळालेल्या डीपी शेतकऱ्यांना देऊ नये ती तपासूनच द्यावी व शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याबाबत आतापासूनच आपल्या वितरणच्या कारभारात सुधारणा करावी या अवकाळी पावसामुळे जे सिमेंट पोल तुटून पडले ते पुन्हा उभे करावेत व जे गावठाण चे डीपी बॉक्स व शेतीपंपाचे डीपी बॉक्स खराब झाले उघडे आहेत ते सर्व नवीन बाॅक्स बसवावे, नवीन बसवल्यास अपघात होणार नाहीत व शेतकऱ्याला जीव गमवावा लागणार नाही. अशी मागणी डॉ. सुधीर कवर यांनी अधीक्षक अभियंता वैद्य साहेब यांच्याकडे केली आहे.जर आठ दिवसांनंतर सुधारणा दिसून आल्या नसल्यास तीव्र आंदोलन उभे करु याबाबत आपणच सर्वस्वी जबाबदार असाल असे खडसावून सांगण्यात आले. याप्रसंगी विश्वनाथजी सानप मा. सभापती,,डॉ.चंद्रशेखर देशमुख मा.उपजिल्हाप्रमुख, अशोकरावजी अंभोरे उपजिल्हाप्रमुख, गणेश अन्ना देशमुख वाहतूक सेना जिल्हाप्रमुख, नारायणराव आरू रिसोड तालुकाप्रमुख बंडूभाऊ शिंदे सहकार सेना जिल्हाप्रमुख, डॉ.गजानन सानप युवासेना तालुका प्रमुख, हेमंत घोडे युवासेना रिसोड -मालेगाव,राजु आरु संचालक कृ.ऊ.बा.समीती रिसोडलक्ष्मण ठोकळ, घनश्याम मापारी मा.संचालक, सुरेश बाजड, संतोषभाऊ सुर्वे, संदीप बाजड,रवि मोरे मा.सरपंच घोटा इत्यादी शिवसैनिक व शेतकरी कार्यालयात उपस्थित होते.

0 9 3 7 1 1
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *