वाशिम प्रतिनिधी,
वाशिम : दि. १२, युवा कार्यक्रम येऊन खेळ मंत्रालय भारत सरकार राष्ट्रीय सेवा योजना श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने ग्राम कोंढाळा झांबरे येथे श्रम संस्कार विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाला उपस्थित असलेले अमरावती शिक्षण मतदारसंघाचे आमदार आणि किरण राव सरनाईक , गावातील सरपंच सौ. मानवतकर ताई, मावीम सहाय्यक जिल्हा समन्वयक देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. किशोर वाहने, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.भारती देशमुख मॅडम, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय वानखेडे यांच्यासह गावातील ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नागरिक यांची आदी मान्यवर यांची उपस्थिती होती यावेळी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.श्रम संस्कार विशेष शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी स्वयंसेवक प्रदीप पट्टेबहादूर यांनी या आठ दिवसीय शिबिरामध्ये विविध सामाजिक उपक्रम पथनाट्य ,कृतिशील गीत, अंधश्रद्धा निर्मूलन, समाज प्रबोधन ,लोकगीत आणि वासुदेवाची पारंपारिक वेशभूषा च्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग ,पाणी आडवा पाणी जिरवा, कालवे बोरी बंधारा तयार करण्याकरिता व वृक्षारोपण अशा अनेक विषयांवर गावांमध्ये प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती केली. आणि समस्त गावकऱ्यांचे व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची मने जिंकली. याच कार्याची दखल घेत या समारोपय कार्यक्रमांमध्ये प्रदीप पट्टेबहादूर यांचा एडवोकेट किरण सरनाईक शिक्षण आमदार अमरावती विभागीय शिक्षण मतदार संघ यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आधी मान्यवर व प्राध्यापक वर्ग शिबिरार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी व गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती.
Users Today : 17