विशेष प्रतिनिधी रामेश्वर वाढी
समस्त राजपूत समाज महाराष्ट्र राज्य आयोजित वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंम्मेलनाचे भव्यदिव्य आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे रविवार दि.१४ मे २०२३ ला सकल राजपूत समाज महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या महासंम्मेलनाचे प्रमुख अतिथी देशाचे संरक्षण मंत्री ना.राजनाथसिंह हे असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते ना.अजित पवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते ना.अंबादास दानवे,आ.नाना पटोले उपस्थित राहणार आहेत

सोबतच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.भागवत कराड,ना.अतुल सावे,ना.संदीपान भुमरे,ना.अब्दुल सत्तार,खा.प्रज्ञासिंह ठाकूर,आ.जयकुमार रावल,आ.उदयसिंह राजपूत,आ.सतिश चव्हाण,आ.हरिभाऊ बागडे,आ.प्रदीप जैस्वाल,आ.संजय सिरसाठ,आ.किशोर पाटील,आ.प्रशांत बंब,मा.आ.सुजितसिंह ठाकूर,मा.आ.दिलीपकुमार सानंदा,मा. आ.रावसाहेब शेखावत,मा.आ . चंद्रकांत रघुवंशी यांची उपस्थिती असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राजपूत समाज बांधव लाखोंच्या संख्येने या महासंम्मेलनात हजर राहणार असल्याचे राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड पुणे जिल्हाध्यक्ष ठा.शिवकुमारसिंह बैस यांनी यावेळी सांगितले आहे.यामध्ये राजपूत समाजातील विविध स्तरातील मांगण्या संदर्भात या महासंम्मेलनात चर्चा होणार आहे.

Users Today : 30