
बोरगाव मंजू येथे छत्रपती संभाजी राजे यांची जयंती उत्साहात साजरी
बोरगाव मंजू येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचा उपक्रम
प्रतिनिधी संतोष गवई अकोला
बोरगाव मंजू
छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले,
प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष संजय देशमुख हे होते तर प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते सखाराम वानखडे, माजी पंचायत समिती सदस्य दादाराव सुलताने, अर्जुन बारस्कर, पत्रकार रमेश समुद्रे, पत्रकार संतोष गवई आदी मान्यवर उपस्थित होते प्रसंगी सर्व प्रथम छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेचे पूजन हारार्पण करून अभिवादन केले दरम्यान उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्याची संकल्पना, केलेल्या देश कार्या बद्दल आपले विचार व्यक्त केले, प्रसंगी अजय वानखडे, अमोल आसरे, अविनाश महाजन, दामोदर उमाळे, सुरेश ठवरे, महादेव जायले, रमेश बाजर, आदी आबालवृद्ध सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते संचालन पत्रकार रमेश समुद्रे, यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञामत शहा यांनी केले,
राष्ट्रीय गिताने कार्यक्रमाची सांगता झाली
Users Today : 30