Khozmaster
1 Min Read

*अकोटात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी…*

 

प्रतिनिधी विशाल गवई अकोट

 

*अकोट* : छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र अठरा पगड जातीवर प्रेम करणारे शूरवीर संभाजी महाराज यांनी वडिलांच्या निधनानंतर मराठा राज्याचा कारभार सांभाळला. त्यानंतर 1681 ते 1689 अशी नऊ वर्षे त्यांनी दुसरे छत्रपती म्हणून राज्य केले. 14 मे ही त्यांची जयंती म्हणून सर्व महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

त्यानिमित्ताने अकोट शहरात छ.संभाजी महाराज चौक येथे मा.आमदार संजय गावंडे,शिवसेना गटनेते नगरसेवक मनीष कराळे,निनाद मानकर,अक्षय घायल यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व यावेळी मान्यवरांनी छ. संभाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जिवन कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकत शब्दरुपी अभिवादन केले.यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.त्यामध्ये मनोज खंडारे,प्रतीक गोरे,अनोख गहले,सुभाष तळोकार,प्रतीक भगत,सुमित भगत,नयन तेलगोटे,जितेश गलांडे,विनय वगारे,भाविक वगारे,दिनेश सभागचंदानी,सुशील लोनकर,गौरव तायडे,ओम नेमाड़े,तुषांत शिरशाट,सौरभ तायडे,निलेश मोगरे, शुभम गिरी यांची उपस्थिती लाभली होती.

0 9 4 6 8 0
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *